आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 207.29 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 3.96 कोटींपेक्षा जास्त किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,25,076

गेल्या 24 तासात 16,299 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.53%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.85%

Posted On: 11 AUG 2022 9:51AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 207.29  (2,07,29,46,593) कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,75,36,174 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.


देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.96  (3,96,45,370) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10412843

2nd Dose

10097169

Precaution Dose

6505170

FLWs

1st Dose

18432431

2nd Dose

17682327

Precaution Dose

12644292

Age Group 12-14 years

1st Dose

39645370

2nd Dose

28924432

Age Group 15-18 years

1st Dose

61411968

2nd Dose

51629137

Age Group 18-44 years

1st Dose

559939982

2nd Dose

510546366

Precaution Dose

37056551

Age Group 45-59 years

1st Dose

203775969

2nd Dose

195707830

Precaution Dose

23072528

Over 60 years

1st Dose

127500642

2nd Dose

122316154

Precaution Dose

35645432

Precaution Dose

11,49,23,973

Total

2,07,29,46,593

 


भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या 1,25,076  इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.28% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.53%. झाला आहे.

गेल्या 24 तासात 19,431 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,35,55,041 झाली आहे.

गेल्या 24 तासात 16,299 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.


गेल्या 24 तासात एकूण 3,56,153  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 87.92  (87,92,33,251) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.85% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.58% आहे.

 


****


Sonal.T/Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1850795) Visitor Counter : 139