दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कॅप्टिव्ह बिगर सार्वजनिक (खाजगी) नेटवर्क उभारणाऱ्या कंपन्याना थेट स्पेक्ट्रम (तरंग) देऊ करण्यासाठी दूरसंचार विभाग मागणीनुसार अध्ययन हाती घेणार


मागणीचा अभ्यास करण्यासाठी सरलसंचार पोर्टलवर प्रारुप सुरू

ज्या संस्थांची निव्वळ संपत्ती 100 कोटी पेक्षा अधिक आहे आणि थेट दूरसंचार विभागाकडून स्पेक्ट्रम मिळवून सीएनपीएनएस उभारण्यास इच्छुक असलेल्यांना या अभ्यासात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे

Posted On: 10 AUG 2022 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2022

कॅप्टिव्ह बिगर सार्वजनिक (खाजगी) नेटवर्क, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित, विश्वासार्ह, कमी विलंब आणि उच्च दूरसंवाद प्रदान करत उद्योगांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. सीएनपीएन करिता कायदेशीर चौकट स्थापन करण्याच्या उद्देशाने सरकारने 27 जून 2022 रोजी कॅप्टिव्ह बिगर सार्वजनिक (खाजगी) नेटवर्क (सीएनपीएन) परवान्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.

मार्गदर्शक तत्त्वांनुसार सीएनपीएन उभारू इच्छिणारे उद्योग दूरसंचार सेवा प्रदात्यांकडून किंवा थेट दूरसंचार विभागाकडून भाडेतत्त्वावर स्पेक्ट्रम मिळवू शकतात. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कॅप्टिव्ह बिगर सार्वजनिक (खाजगी) नेटवर्क उभारणाऱ्या कंपन्याना थेट स्पेक्ट्रम (तरंग) देऊ करण्यासाठी दूरसंचार विभाग मागणीनुसार अध्ययनही हाती घेणार आहे.

दूरसंचार विभागाने आता मागणीचा अभ्यास करण्यासाठी सरलसंचार पोर्टलवर एक प्रारुप सुरु केले आहे.  https://saralsanchar.gov.in वर ते उपलब्ध आहे. या संदर्भात 09-08-2022 रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

ज्या संस्थांची निव्वळ संपत्ती 100 कोटी पेक्षा अधिक आहे आणि थेट दूरसंचार विभागाकडून स्पेक्ट्रम मिळवून सीएनपीएनएस उभारण्यास इच्छुक असलेल्यांना या अभ्यासात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. पोर्टलवर 10-08-2022 ते 09-09-2022 पर्यंत तपशील सादर केला जाऊ शकतो.

 

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1850556) Visitor Counter : 195