शिक्षण मंत्रालय

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्या अंतर्गत शैक्षणिक ढाचा तसेच अभ्यासक्रमविषयक पुनर्रचना करण्याच्या संदर्भात उपयुक्त सूचना मिळविण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आंतर-मंत्रालयीन बैठकीचे केले आयोजन

Posted On: 09 AUG 2022 9:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2022

 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वर आधारलेला नवा एनसीएफ अर्थात राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा विकसित करण्यासाठी विस्तृत प्रमाणात सुरु असलेली सल्ला सूचना प्रक्रिया पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने भारत सरकारच्या सर्व मंत्रालयांतील तसेच विभागांतील आणि एनसीईआरटी, भारतीय निवडणूक आयोग, आयसीएआर, डीआरडीओ इत्यादी महत्त्वाच्या संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी/ प्रतिनिधींची बैठक घेतली. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग सचिव अनिता करवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विकासाच्या विविध टप्प्यांवर असलेल्या शिक्षणार्थींच्या विकासात्मक गरजा आणि रुची यांच्याशी संबंधित असलेला आणि प्रतिसादात्मक अभ्यासक्रम आराखडा विकसित करण्यासाठी मंत्रालये आणि इतर संस्था कशा प्रकारे योगदान देऊ शकतील यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांसाठी, अभ्यासक्रम आराखडा कसा तयार केला, त्यातून काय साध्य होणार आहे तसेच या कामी अधिकाऱ्यांकडून काय कार्य होणे अपेक्षित आहे याबाबत  शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या अतिरिक्त सचिव एलएस चांगसन यांनी सादरीकरण केले. तसेच उपस्थितांना योगदान देता येऊ शकेल अशा विविध क्षेत्रांबाबत बैठकीत चर्चा झाली.

बालपण देखभाल आणि शिक्षण, मुलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र, योग्यतेवर आधारित शिक्षण, बहुभाषिकता यांच्यासह, भारताचे नागरिकत्व, राष्ट्रीय वारशाची प्रशंसा, सार्वजनिक मालमत्तेचा सन्मान, वृद्धांची काळजी घेणे, सेवाभावी वृत्ती, विशिष्ट प्रकारच्या मुलांच्या वेगळ्या गरजा, प्रयोगात्मक शिक्षण इत्यादी मूल्यांचा समावेश यांसारख्या एनसीएफच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांबाबत बैठकीत तपशीलवार चर्चा करण्यात आली.

नवा एनसीएफ तयार करण्यासाठी केंद्रीय शिक्षण विभागाने हाती घेतलेल्या कार्याचे निर्णायक स्वरूप लक्षात घेऊन सहभागींनी या प्रक्रियेत योगदान देण्याबाबतच्या त्यांच्या कल्पना सामायिक केल्या.

सर्व मंत्रालयांनी त्यांच्या सूचनांची दखल घेतली जावी यासाठी त्या लिखित स्वरुपात राष्ट्रीय सुकाणू समिती आणि एनसीईआरटीकडे पाठवाव्यात असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. एनसीईआरटीतर्फे सुरु करण्यात आलेल्या https://survey-ncf.inroad.in/#/  या वेब- ॲप आधारित नागरिक सर्वेक्षणात सर्व मंत्रालयांनी मनःपूर्वक सहभाग नोंदवावा अशी विनंती देखील बैठकीच्या अंतिम टप्प्यात मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या ॲप वरील प्रश्नावली विविध 22 भारतीय भाषांमध्ये तसेच इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.

एनसीएफ प्रक्रियेचे अवलोकन करण्यासाठी कृपया https://ncf.ncert.gov.in/#/web/home येथे क्लिक करा.

 

 

 

 

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1850343) Visitor Counter : 196


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil