युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी भारताने पटकावली 4 सुवर्ण, 1 रौप्य आणि एका कांस्यपदकासह 6 पदकं, एकूण 22 सुवर्णपदकांसह भारताच्या पदकांची संख्या पोहोचली 61वर


शेवटच्या दिवशी पी. व्ही सिंधू, लक्ष्य सेन, सात्विक साईराज, रंकीरेड्डी/चिराग शेट्टी आणि अचंता शरथ कमल यांनी जिंकली सुवर्ण पदके

Posted On: 08 AUG 2022 11:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2022

 

प्रमुख वैशिष्ट्ये:

  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्यांचे, त्यांच्या असाधारण कामगिरीबद्दल  केले अभिनंदन
  • अनुराग ठाकूर यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन, हे उत्कृष्टता आणि निर्धाराचे विस्मयकारी प्रदर्शन असल्याची व्यक्त केली प्रतिक्रिया  

 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताने 4 सुवर्ण, 1 रौप्य आणि एका कांस्य पदकासह सहा पदके पटकावली.  पी. व्ही सिंधू(महिला एकेरी बॅडमिंटन), लक्ष्य सेन(पुरुष एकेरी बॅडमिंटन), सात्विक साईराज रंकीरेड्डी/ चिराग शेट्टी(पुरुष दुहेरी बॅडमिंटन) आणि अचंता शरथ कमल( पुरुष एकेरी टेबल टेनिस) या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले  तर पुरुषांच्या हॉकी संघाने रौप्यपदक पटकावले. जी सत्यन( पुरुष एकेरी टेबल टेनिस) याने कांस्य पदक पटकावले. एकूण 61 पदकांसह( 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य ) पदकतालिकेत भारताने चौथ्या स्थानावर झेप घेतली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी पदक विजेत्यांचे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.

राष्ट्रपतींनी सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सिंधू हिचे अभिनंदन करताना राष्ट्रपतींनी ट्वीट केले आहे, “ पी. व्ही सिंधू हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावून देशवासियांची मने  जिंकली आहेत. तू बॅडमिंटन कोर्टवर केलेल्या जादुई कामगिरीने लाखोंवर गारुड केले  आहे. संपूर्ण वर्चस्व गाजवणाऱ्या तुझ्या खेळीने आपला तिरंगा ध्वज अभिमानाने उंचावर फडकत आहे आणि आपल्या राष्ट्रगीताचे सूर बर्मिंघममध्ये घुमले आहेत. हार्दिक अभिनंदन!

राष्ट्रपतींनी लक्ष्य सेनचे अभिनंदन केले आहे आणि ट्वीट केले आहे, “तरुण आणि उर्जावान लक्ष्य सेनने भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनचं सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. ज्या प्रकारे तू पुन्हा आपली कामगिरी उंचावली आणि सामन्यावर पूर्ण वर्चस्व मिळवलं त्यातून जिंकण्याचा निर्धार असलेल्या एका नव्या धाडसी भारताचे प्रतिबिंब दिसत आहे. तुझ्यामुळे पुन्हा एकदा  बर्मिंघममध्ये आपला  तिरंगा उंचावला आहे.”  

शरथ कमल याला शुभेच्छा देताना राष्ट्रपतींनी ट्वीट केले आहे, कमालीची गुणवत्ता असलेल्या आणि सर्वाधिक अनुभवी शरथ कमलने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसचे सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला आहे. तुझे उल्लेखनीय सातत्य तुला क्रीडा क्षेत्राचा आदर्श बनवत आहे. तुझ्या विशेष कामगिरीमुळे पोडियमवर आपला तिरंगा डौलाने फडकत असलेला पाहून भारतीयांमध्ये आनंदाचे  वातावरण आहे. अभिनंदन!”

बॅडमिंटन संघाचे अभिनंदन करताना राष्ट्रपतींनी ट्वीट केले आहे, “आपल्या बॅडमिंटनच्या पथकाने इतिहास घडवला आहे! #CommonwealthGames मध्ये दुहेरीचे सुवर्णपदक जिंकल्याबद्दल  सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे अभिनंदन. तुमचा विजय युवा वर्गाला प्रेरणा देणारा आहे. तुमच्या विजयामुळे बर्मिंघम  येथे आपल्या राष्ट्रगीताचे सूर घुमल्यामुळे भारतीयांना अभिमानास्पद वाटत आहे.”

पुरुषांच्या हॉकी स्पर्धेचे अभिनंदन करताना राष्ट्रपतींनी ट्वीट केले, “ आपल्या पुरुष हॉकी संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. तुमचे प्रयत्न आणि संपूर्ण स्पर्धेत समर्पित भावनेने केलेली तुमची कामगिरी प्रशंसेला पात्र आहे.”

साथियान  याला शुभेच्छा देताना राष्ट्रपतींनी ट्वीट केले आहे,” राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये टेबल टेनिसमध्ये पुरुषांच्या एकेरी स्पर्धेत अतिशय चुरशीच्या सामन्यात कांस्य पदक जिंकल्याबद्दल साथियान  ज्ञानसेकरन याचे अभिनंदन. दबावाखाली देखील तू शांत राहिलास आणि अतिशय प्रभावी कौशल्य आणि निर्धाराचे दर्शन घडवून हा विजय मिळवला. तुझ्या भावी वाटचालीसाठी सर्वोत्तम शुभेच्छा.”

 

 

 

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्मिंघम  येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पदके जिंकणाऱ्या सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. 

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले; "अद्वितीय अशी पीव्ही सिंधू  ही निर्विवाद अजिंक्य आहे! सर्वोत्कृष्टता म्हणजे काय हे तिने वारंवार दर्शवले आहे . तिचे समर्पण आणि वचनबद्धता अवर्णनीय आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातल्याबद्दल तिचे अभिनंदन. तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी तिला खूप शुभेच्छा."

पंतप्रधानांनी ट्विट करत लक्ष्य सेनेचे अभिनंदन केले, ''लक्ष्य सेन याने केलेल्या  कामगिरीमुळे आनंद झाला. बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये त्याने उत्कृष्ट खेळ केला आणि अंतिम सामन्या दरम्यान उत्तम लवचिकता दर्शवली. तो भारताचा अभिमान आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा #Cheer4India”."

भारतीय बॅडमिंटन संघाला शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी ट्विट केले; “भारताच्या बॅडमिंटन संघाने  यश आणि उत्कृष्टता  पुन्हा एकदा परिभाषित केली आहे. सात्त्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी  सांघिक कृती आणि कौशल्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन घडवले. देशाला सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल त्यांचा अभिमान वाटतो. आगामी काळात ते भारताचा  आणखी नावलौकिक वाढवत राहोत   #Cheer4India"

पंतप्रधानांनी ट्विट करत शरथ कमल याचे अभिनंदन केले; “शरथ कमलने पटकावलेल्या सुवर्णपदकाची  इतिहासात अत्यंत विशेष म्हणून नोंद होईल. त्याने संयम, दृढनिश्चय आणि लवचिकतेचे दर्शन घडवले. त्याने उत्तम कौशल्यही दाखवले.हे पदक भारतीय टेबल टेनिससाठी मोठे प्रोत्साहन  आहे.त्याचे अभिनंदन आणि शुभेच्छा  #Cheer4India.”

पंतप्रधानांनी ट्विट करत साथियानचे अभिनंदन केले; "संपूर्ण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा  2022 मध्ये साथियान ज्ञानसेकरनची अप्रतिम कामगिरी. टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो.  त्याची चिकाटी आणि समर्पण प्रशंसनीय आहे. आगामी स्पर्धांमध्येही तो उत्कृष्ट कामगिरी करेल याची मला खात्री आहे.#Cheer4India"

बर्मिंघम  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा  2022 मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत  भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन केले; "राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये शानदार  कामगिरी केल्याबद्दल आणि रौप्य पदक जिंकल्याबद्दल पुरुष हॉकी संघाचा अभिमान आहे. हा संघ आगामी काळातही भारताचा गौरव  कायम ठेवेल आणि तरुणांना हॉकी खेळण्यासाठी प्रेरित करेल,असा मला विश्वास आहे. #Cheer4India"

 

 

 

 

 

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

ठाकूर यांनी ट्विट करत  सिंधूचे अभिनंदन केले; पीव्ही सिंधूच्या चमकदार कामगिरीने   पुन्हा एकदा इतिहास घडवला. ! तिने आमचे  आमच्या टीव्ही स्क्रीनवरचे लक्ष ढळू दिले नाही ! उत्कृष्टतेचे  आणि दृढनिर्धाराचे  अद्भुत प्रदर्शन ! उल्लेखनीय सुवर्णपदकासाठी अभिनंदन.#CWG2022! पीव्ही सिंधू तू भारताचा अभिमान आहेस !”

दुसऱ्या  एका ट्विटमध्ये क्रीडामंत्र्यांनी लक्ष्य सेनचे अभिनंदन केले.ठाकूर यांनी ट्विट केले; "सेन - सेशनल !!! सुवर्ण  लक्ष्य सेन, तू तरुण भारताच्या भावनेला मूर्त रूप देणारा आणि ती प्रदर्शित करणारा  सेनानी आहेस ! तू सामन्यावर पुन्हा वर्चस्व गाजवलेस आणि एका निर्धारी विजेत्याप्रमाणे  हा विजय मिळवलास !आमच्या हृदयाचे ठोके वाढत होते! तुझा सामना  पाहात असताना  खूप आनंद झाला! खूप छान आणि अभिनंदन!”

सात्विक आणि चिराग यांचे अभिनंदन करताना क्रीडा मंत्री यांनी ट्विट केले, “इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नोंदवली जाईल अशी त्यांची कामगिरी ! सात्विक आणि चिराग यांनी इंग्लंडला पराभूत करत दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर  खूप आनंद झाला.विजयानंतरचे सात्विकचे  नृत्य म्हणजे आनंदाची परिसीमा होती ! दोघांचेही  अभिनंदन!”

पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन करताना  ठाकूर यांनी ट्विट केले, “राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील  पुरुष आणि महिला हॉकी संघांचा विजय हा   हॉकीचा  समृद्ध वारसा असलेल्या आपल्या देशासाठी संस्मरणीय आहे ! अभिनंदन, तुमच्या प्रयत्नांचा अभिमान वाटतो!”

 

 

 

 

* * *

S.Kakade/S.Patil/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1850102) Visitor Counter : 260


Read this release in: English , Urdu , Hindi