पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नद्यांच्या संवर्धनासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर)

Posted On: 08 AUG 2022 6:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2022

 

वनीकरणाच्या माध्यमातून ,सतलज, बियास, रावी, चिनाब, झेलम, लुनी, यमुना, महानदी, ब्रह्मपुत्रा, नर्मदा, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या 13 प्रमुख नद्यांच्या  संवर्धनासाठी , डेहराडूनच्या भारतीय वनीकरण, संशोधन आणि शिक्षण परिषदेने (आयसीएफआरई) तयार केलेले  विस्तृत  प्रकल्प अहवाल पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मार्च , 2022. मध्ये प्रकाशित केले. रोजगार निर्मिती करण्यासह पाणलोट क्षेत्रात वृक्षारोपण, मृदा आणि आर्द्रता संवर्धनाची कामे आणि हरित आच्छादन वाढवणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे , गाळ  काढणे  आणि पुराचे प्रमाण कमी करणे  आणि भूजल पाणी पातळी  वाढवणे इत्यादींचा या कार्यक्रमामध्ये समावेश आहे. या तेरा डीपीआरमध्ये पाच वर्षांसाठी प्रस्तावित केलेल्या  4 प्रमुख घटकांतर्गत , उदा (अ) वनीकरण हस्तक्षेपांची अंमलबजावणी, (ब) ज्ञान व्यवस्थापन आणि राष्ट्रीय क्षमता बांधणी  बळकट करणे, (क) गुणवत्ता सुधार  आणि यशस्वी नमुन्याच्या प्रतिकृती  देखभाल टप्पा  आणि (ड ) वनीकरण हस्तक्षेप आणि नदी संवर्धनासाठी राष्ट्रीय समन्वय या हस्तक्षेप कार्यक्रमांची  एकूण आर्थिक गरज ही 19,342.62 कोटी रुपये आहे. बहु-विभागीय सहभागासह अंमलबजावणीसाठी विस्तृत  प्रकल्प अहवाल हे  संबंधित राज्य सरकारांशी सामायिक करण्यात आले आहेत. कृषी आणि फलोत्पादन विभाग, शहरी महानगरपालिका,ग्रामविकास विभाग इत्यादी या संबंधित विभागांनी एकत्रितपणे   केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांतर्गत निधी स्रोतांसह   विस्तृत  प्रकल्प अहवालांची अंमलबजावणी करण्याची संकल्पना आहे.

विस्तृत  प्रकल्प अहवाला नुसार  कायापालट करण्यात  येणाऱ्या क्षेत्राचा  नदीनिहाय तपशील खालील परिशिष्टात दिलेला आहे.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Kakade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1849994) अभ्यागत कक्ष : 169
Read this releasein: English , Urdu , Telugu