कृषी मंत्रालय
जल व्यवस्थापनासाठी आंतरराष्ट्रीय अर्ध-शुष्क कटिबंधातील पीक संशोधन संस्था(आयसीआरआयएसएटी) आणि भारतीय कृषी संशोधन संस्था (आयसीएआर)मध्ये भागीदारी
Posted On:
05 AUG 2022 7:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2022
भारतीय कृषी संशोधन संस्था (आयसीएआर)- आंतरराष्ट्रीय अर्ध-शुष्क कटिबंधातील पीक संशोधन संस्था(आयसीआरआयएसएटी) सहयोगी कार्य योजनेमध्ये (2019-2023) तीन संशोधन प्रकल्पांचा समावेश आहे . शेंगा असलेली धान्ये (हरभरा, तुरी आणि भुईमूग) आणि कोरडवाहू तृणधान्ये (ज्वारी, बाजरी आणि नाचणी) यांची उत्पादक क्षमता, जुळवून घेण्याची क्षमता आणि परिणाम तसेच गुणवत्ता वैशिष्ट्ये वाढविण्यासाठी या पिकांचा जनुकीय विकास , यापैकी एका प्रकल्पाच्या केंद्रस्थानी आहे. अवर्षणप्रवण वातावरणात बाजरीच्या विविध जाती विकसित करण्यासाठी एक सहयोगी प्रकल्प सप्टेंबर 2021 मध्ये पूर्ण झाला आहे.विज्ञान-आधारित पर्जन्य जलसंचयाच्या माध्यमातून आणि व्यवस्थापन तंत्रज्ञान वापरून कोरडवाहू क्षेत्राची उत्पादकता सुधारण्याच्या अनुषंगाने संभाव्य सहकार्यासाठी आयसीआरआयएसएटी अनेक आयसीएआर संस्थांसोबत कार्यरत आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1848876)
Visitor Counter : 133