संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिलेल्या नऊ नव्या सैनिकी शाळांमध्ये शैक्षणिक सत्र सुरू


संरक्षण मंत्रालयाने भागीदारी पद्धतीने अतिरिक्त 7 नव्या सैनिकी शाळा सुरू करायला मंजुरी दिली

Posted On: 04 AUG 2022 10:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2022

 

भागीदारी पद्धतीने शंभर नव्या शाळा स्थापन करण्याच्या केंद्र सरकारच्या उद्दिष्टांअन्वये, पहिल्या टप्प्यात 12 शाळा सुरू करण्यासंदर्भात सैनिक स्कूल सोसायटी मध्ये सहमती करार करण्यात आला.सैनिक शाळा पद्धतीनुसार अशा 10शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश पूर्तता झाल्यानंतर,9 शाळांमध्ये शैक्षणिक सत्र 1ऑगस्ट 2022 पासून सुरु झाले आहे. 6 सप्टेंबर 2022 पासून कर्नाटक मधल्या एका शाळेत शिक्षणाला सुरुवात होणार आहे . उर्वरित दोन शाळा या ग्रीनफील्ड स्कूल  असल्याने, त्यांचे कामकाज हे पुढच्या शैक्षणिक सत्रा पासून सुरू होईल .यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सैनिक स्कूल सोसायटीने, या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात 7 अतिरिक्त शाळांना मंजुरी दिली आहे. या प्रस्तावित 7 शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक सत्र हे ऑगस्ट 2022 च्या शेवटपर्यंत  सुरू होण्याची शक्यता आहे. या नव्याने मंजुरी मिळालेल्या सैनिकी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया ही पहिल्या टप्प्यात मंजुरी मिळालेल्या शाळांप्रमाणेच असणार आहे. या नव्याने मंजुरी मिळालेल्या सैनिकी शाळेमध्ये 40% जागा या ऑल इंडिया सैनिक स्कूल्स एंट्रन्स एक्झाम म्हणजेच अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश पात्रता परीक्षा(AISSEE) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्या मधून ई कौन्सिलिंग च्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत आणि यातल्या 60% जागा या, या शाळांमध्ये पूर्वीपासून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी(NTA) अर्थात राष्ट्रीय पात्रता संस्थेने घेतलेल्या परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जातील, यासाठी न्यू सैनिक स्कूल एन्ट्रन्स एक्झामिनेशन 2022(NSSEE-22) ही परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या मधल्या काळात राष्ट्रीय पात्रता संस्थेमार्फत घेतली जाईल. नव्याने मंजुरी मिळालेल्या शाळेतील प्रवेश प्रक्रिया समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://sainikschool.ncog.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असा सल्ला देण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात मंजुरी मिळालेल्या सैनिक शाळांची यादी खालील प्रमाणे

Sl. No.

STATE

DISTT.

NAME OF SCHOOL

1

ANDHRA PRADESH

SPS NELLORE

ADANI COMMUNITY EMPOWERMENT FOUNDATION

2

BIHAR

PATNA

KESHAV SARASWATI VIDYA MANDIR

3

GUJARAT

MEHSANA

DUDHSAGAR RESEARCH AND DEVELOPMENT ASSOCIATION

4

HARYANA

ROHTAK

SHRI BABA MASTH NATH AYURVEDIC AND SANSKRIT SHIKSHAN SANSTHAN

5

KARNATAKA

MYSURU

SWAMI VIVEKANANDA YOUTH MOVEMENT

6

KERALA

KOZHIKODE

VEDVYASA VIDYALAYAM SENIOR SECONDARY SCHOOL

7

MAHARASHTRA

SANGLI

S K INTERNATIONAL SCHOOL

 

 

S.Patil/V.Yadav/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1848560) Visitor Counter : 205


Read this release in: English , Urdu , Hindi