कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
डिजिटल केंद्रीय सचिवालयाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी डॉ. जितेंद्र सिंह 5 ऑगस्ट 2022 रोजी सीएसएमओपी 2022 चा प्रारंभ करणार
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2022 9:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2022
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह उद्या प्रशासन सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या 4 प्राथमिक प्रकाशनांचा प्रारंभ करतील.
प्रकाशने पुढीलप्रमाणे आहेत:
1. केंद्रीय सचिवालय कार्यालयीन कामकाज नियमावली 2022
2. केंद्रीय सचिवालय 2022 मध्ये निर्णय कार्यक्षमता वाढवण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा प्रभाव मूल्यमापन अहवाल
3. स्वच्छता मूल्यांकन अहवाल 2022
4.CPGRAMS मासिक अहवाल जुलै 2022
चारही अहवाल www.darpg.gov.in वर उपलब्ध असतील.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1848551)
आगंतुक पटल : 186