कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रविण कुमार श्रीवास्तव आणि अरविंद कुमार यांनी दक्षता आयुक्त म्हणून घेतली शपथ

प्रविष्टि तिथि: 03 AUG 2022 4:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 ऑगस्‍ट 2022

 

प्रवीणकुमार श्रीवास्तव आणि अरविंद कुमार यांनी आज दक्षता आयुक्त म्हणून शपथ घेतली. त्यांना केंद्रीय दक्षता आयुक्त सुरेश एन पटेल यांनी केंद्रीय दक्षता आयोगाच्या कार्यालयात, सातारकाटा भवन, नवी दिल्ली येथे शपथ दिली. 21 जुलै 2022 रोजी राष्ट्रपतींनी त्यांची केंद्रीय दक्षता आयोगामध्ये दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती केली.

तत्पूर्वी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सुरेश एन पटेल यांना केंद्रीय दक्षता आयुक्त पदाची शपथ दिली. पटेल यांची 29 एप्रिल 2020 रोजी दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते 24 जून 2021 पासूनच केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कार्यरत होते.

    

* * *

S.Kane/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1847902) आगंतुक पटल : 1753
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi