भूविज्ञान मंत्रालय

स्वच्छ सागर, सुरक्षित सागर मोहीम

Posted On: 03 AUG 2022 3:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 ऑगस्‍ट 2022

"स्वच्छ सागर, सुरक्षित सागर/स्वच्छ किनारा सुरक्षित समुद्र" ही ७५ दिवसांची नागरिकांच्या नेतृत्वाखालची सामूहिक कृतीद्वारे सागरी आरोग्य सुधारण्यासाठीची मोहीम आहे. 5 जुलै 2022 रोजी ही मोहीम सुरू झाली  आहे.  वर्तन बदलाद्वारे परिवर्तन आणि पर्यावरण संवर्धनाचे लक्ष्य असलेली या मोहिमेची 3 धोरणात्मक उद्दिष्टे आहेत.

मोहिमेची तीन मूलभूत उद्दिष्टे अशी आहेत - 1. जबाबदारीने वापरा 2. घरातील कचरा वेगळा करा आणि 3. जबाबदारीने विल्हेवाट लावा. स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतानाच, 75 समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम किनारपट्टीवरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 75 स्वयंसेवकांसह ही मोहीम राबविण्यात येणार आहे. भारताच्या 7500पेक्षा अधिक किलो मीटर लांब असलेल्‍या 75 ठिकाणी असलेल्‍या  समुद्रकिनाऱ्यांवर, 17 सप्टेंबर 2022 रोजी (आंतरराष्ट्रीय कोस्टल क्लीनअप डे) साफसफाईचा सर्वात मोठा उपक्रम राबविल्यावर ही मोहीम संपणार आहे.

या मोहिमेत पृथ्वी विज्ञान मंत्रालय (MoES), पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEFCC), शिक्षण मंत्रालय, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), भारतीय तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA), पर्यावरण संरक्षण गतिविधी (PSG), इतर सरकारी विभागांसह, सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्था सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमासाठी अंदाजे 10 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण भारतात 75 किनारे चिन्हीत करण्यात आले आहेत. त्यात महाराष्‍ट्रातले सहा सागरी किना-यांचा समावेश आहे. मुंबईमधील  जुहूबीच, गिरगाव चौपाटी, मांडवी बीच, मुरूड किनारा, चिखली किनाारा यांचा समावेश आहे.तसेच गोव्‍यातल्‍या मिरामार किनाराही स्‍वच्छ करण्‍यात येणार आहे.

निवडलेल्या समुद्रकिनाऱ्यांची संपूर्ण यादी परिशिष्टात दिली आहे. मुख्य समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम 17 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी 05 जुलै 2022 रोजी काम सुरू झाले आहे.

उदरनिर्वाहासाठी महासागर आणि समुद्रकिनारे यावर अवलंबून असलेले स्थानिक, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण आणि सामान्य नागरिकांपर्यत मोहीम मुख्य संदेश पोहोचविण्यासाठी आभासी आणि प्रत्यक्ष भेटी असे दोन्ही मार्ग अंमलात आणले जातील. पर्यावरणीय शाश्वततेला चालना देण्यासाठी या सगळ्यांना जीवनशैली आणि वर्तणुकीतील बदलांचा अवलंब करण्यासाठी या मोहिमेद्वारे प्रोत्साहन दिले जाईल.

आभासी कृतींच्या उदाहरणांमध्ये प्रश्नमंजुषा, प्रतिज्ञा आणि आव्हाने यांचा समावेश होतो. प्रत्यक्ष कृतींमध्ये रॅली , पथनाट्य आणि स्पर्धा इत्यादींसह वास्तविक समुद्रकिनारा स्वच्छ करणे  या गोष्टींना समाविष्ट केले आहे.

सहभागी होणाऱ्यांची सर्वात जास्त संख्या असलेली आणि सर्वात जास्त काळ चालणारी  ही अशा प्रकारची जगातील पहिली किनारपट्टी स्वच्छता मोहीम आहे.

आपले सागरी जीवन प्लॅस्टिकच्या वापरामुळे कसे उद्ध्वस्त होत आहे याबद्दल जनजागृती करणे, जनमानसाच्या वर्तणुकीत योग्य बदल करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘इको मित्रम’ हे मोबाईल अॅप सुरू करण्यात आले आहे. 17 सप्टेंबर 2022 रोजीच्या समुद्रकिनारा स्वच्छतेच्या उपक्रमात सामान्य नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी ऐच्छिक नोंदणी या मोबाईल अॅपवर करता येईल.

सागरी किना-यावरील 1,500 टन सागरी कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. यामुळे सागरी जीव आणि किनारी भागात राहणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळेल.

ANNEXURE

List of Beaches

 

State/UTs

Name of Beaches

Remarks

Daman

DevkaBeach

Daman

JamporeBeach

Maharashtra

JuhuBeach

Mumbai

GirgaonChowpaty

MandaviBeach

Ratnagiri

MalgundaBeach

Murud

Raigad

Chikhale

Palghar

Goa

Miramar

Panji

 

Baina

vasco

 

Bogmalo

 

Velsao

SouthGoa

 

ColvaBeach

Karnataka

PanamburBeach

Mangalore

MalpeBeach

Malpe

GorteeBeach

Bhatkal

AghanashiniBeach

Kumta

Kerala

BeyporeBeach

Kozhikode

CheraiBeach

Ernakulam

KuzihipallyBeach

AzheekalBeach

Kollam

KovalamBeach

Thiruvananthapuram

Lakshadweeep

KatcheryJettyBeach

Kavarathi

MoolaBeach

Androth

Kodi Beach

Minicoy

Gujarat

ChowpatiBeach

Porbandar

MadhavpurBeach

Porbandar

Somnath Beach

GirSomnath, Veraval

GhoghlaBeach

Diu, Veraval

JhanjmerBeach

Bhavnagar, Pipavav

PingleshwarBeach

BhujWest, Jakhau

NararaBeach

Vadinar, Vadinar

MandaviBeach

Mandavi, Mundra

OkhalighthousetoPawanChakki

Okha

DandiBeach

Navasari, Surat

Andhra Pradesh

 

Andhra Pradesh

RKBeach

Visakhapatnam

YaradaBeach

  Visakhapatnam

RushikondaBeach

  Visakhapatnam

KakinadaBeach

Kakinada

NTRBeach

  Kakinada

DhindiBeach

Nizampatnam

SuryalankaBeach

Nizampatnam

KrishnapatnamBeach

Krishnapatnam

 

Tamil Nadu

 

MarinaBeach

Chennai

BesantNagar Beach

  Chennai

ThiruvanmiyurBeach

  Chennai

Aryaman Beach

Mandapam

PirappanvalasaiBeach

Mandapam

VOCBeach

Tuticorin

MuthunagarBeach

Tuticorin

Mullakadu Beach

Tuticorin

Puducherry

 

GandhiBeach

Puducherry

AurovilleBeach

Puducherry

KilinjameduBeach

karaikal

KaraikalBeach

karaikal

  West Bengal

HaldaiRiverFrontBeach

Haldai

BakkhaliSeaBeach

Bakkhali

HenryIslandBeach

Bakkhali

DighaBeach

Digha

Odisha      

ParadipBeach

Paradip

NehruBanglaBeach

Paradip

ChandravagaBeach

Paradip

Puri Beach

Puri

Gopalpur Beach

Ganjam

BateswarBeach

Ganjam

  A &N Islands

Kalipr Beach

Diglipur

KarmathatangBeach

Mayabunder

RamanBagichaBeach

Rangat

CarbineCovesBeach

  PortBlair

RadhanagarBeach

SwarajDweep

ChattanBeach

Hutbay

KanakaBeach

Kamorta

GandhiNagar Beach

  CampbellBay

MalaccaBeach

  Carnic

Kalasi Beach

Teressa

 

* * *

S.Bedekar/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1847889) Visitor Counter : 471


Read this release in: English , Urdu , Gujarati , Tamil