रसायन आणि खते मंत्रालय
महाराष्ट्रातील औषध उत्पादन उद्योग
Posted On:
02 AUG 2022 10:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2022
औषध उत्पादन विभागाने अलीकडेच 11 मार्च 2022 रोजी “औषध उत्पादन उद्योगाचे बळकटीकरण (एसपीआय)'' या योजनेची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.ही योजना देशाच्या सर्व भागात लागू आहे.
2021-22 ते 2025-26 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी एकूण 500 कोटी रुपये खर्चाची ही योजना आहे. सामान्य सुविधांसाठी औषध उत्पादन उद्योगाला सहाय्य (एपीआय -सीएफ), औषध उत्पादन तंत्रज्ञान श्रेणीसुधारणा सहाय्य योजना (पीटीयुएएस) तसेच औषधे आणि वैद्यकीय उपकरणे प्रोत्साहन आणि विकास योजना (पीएमपीडीएस ).हे या योजनेतील तीन उपघटक आहेत.
- पीटीयुएएस अंतर्गत, गुणवत्ता आणि तंत्रज्ञान श्रेणीसुधारणेसाठी औषध उत्पादन क्षेत्रातील सूक्ष्म, लघु , मध्यम (एमएसएमई)उद्योगांना सहाय्य प्रदान केले जाते. औषध उत्पादन उद्योगाचे बळकटीकरण (एसपीआय)' योजनेच्या कालावधीत सुमारे 420 एमएसएमई उद्योगांना पाठबळ पुरवण्याचे नियोजन आहे.
- एपीआय -सीएफ अंतर्गत, सामान्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी औषध उत्पादन क्लस्टर्सना पाठबळ दिले जाते. एसपीआय योजनेच्या कालावधीत 10 प्रकल्पांना सहाय्य देण्याची योजना आहे. आर्थिक वर्ष 20-21 मध्ये त्यावेळी एपीआय -सीएफ अंतर्गत 20.00 कोटी रुपयांच्या अनुदान-सहाय्यासह महाराष्ट्रात पुणे येथे सामायिक सुविधा केंद्राच्या निर्मितीसाठी इंदुकेअर फार्मास्युटिकल्स अँड रिसर्च फाउंडेशन (आयपीआरएफ) या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. आतापर्यंत एकूण 18.00 कोटी रुपयांचे अनुदान जारी करण्यात आले आहे.
भारताला औषध उत्पादन क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रणी बनवण्यासाठी औषध उत्पादन विभाग देशातील औषध उत्पादन क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
रसायने आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1847630)