रेल्वे मंत्रालय

रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) जुलै 2022 मध्ये राबवली मानवी तस्करी विरुद्ध महिन्या भराची देशव्यापी मोहीम


आरपीएफच्या मानवी तस्करी विरोधी (एएएचटी) अभियाना अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईमुळे 151 अल्पवयीन मुले, 32 अल्पवयीन मुली (एकूण 183 अल्पवयीन) आणि 3 महिलांची मानवी तस्करांच्या तावडीतून सुटका आणि 47 मानवी तस्करांना अटक

Posted On: 02 AUG 2022 9:59PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑगस्‍ट 2022

 

आदेश आणि नियंत्रणाच्या एकात्मिक रचनेअंतर्गत आरपीएफची देशभरात व्याप्ती आहे. गेल्या काही वर्षांत, आरपीएफने प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक कार्यक्षम प्रतिसाद यंत्रणा विकसित केली आहे. याला आणखी गती देण्यासाठी, जुलै 2022 मध्ये रेल्वेद्वारे मानवी तस्करी विरुद्ध एक महिनाभर चालणारी विशेष मोहीम सुरू करण्यात आली. आरपीएफच्या फील्ड युनिट्सना (क्षेत्रीय दलांना) मानवी तस्करी आणि मानवी तस्करी प्रकरणांचा शोध घेण्याबाबत प्राप्त झालेल्या माहितीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी या संदर्भात राज्य पोलीस, एलईए आणि इतर भागधारकांशी समन्वय साधून काम करण्याचा सल्ला देण्यात आला.

विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना देखील या दिशेने केलेल्या प्रयत्नांमध्ये समन्वय आणण्यासाठी आरपीएफ बरोबर संयुक्त कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती. महिन्याभरात, एएएचटी अभियाना अंतर्गत केलेल्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे 151 अल्पवयीन मुले, 32 अल्पवयीन मुली (एकूण 183 अल्पवयीन) आणि 3 महिलांची मानवी तस्करांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आणि 47 मानवी तस्करांना अटक करण्यात आली. या मोहिमेने रेल्वे द्वारे मानवी तस्करी विरोधात संयुक्त कारवाई करण्यासाठी सर्व भागधारकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मोहिमेदरम्यान विविध संस्था आणि भागधाराकांमध्ये निर्माण झालेला सलोखा आणि सुरळीत समन्वय भविष्यात देखील मानवी तस्करी विरूद्ध शाश्वत मोहीम सुरू करायला उपयोगी ठरेल.   

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1847624) Visitor Counter : 146


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi