अवजड उद्योग मंत्रालय
इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेविषयी केंद्र सरकार दक्ष; तीन उत्पादन कंपन्यांनी आपली इलेक्ट्रिक वाहने परत मागवली
प्रविष्टि तिथि:
02 AUG 2022 5:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2022
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेशी निगडित अलीकडेच उद्भवलेल्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी, डीआरडीओ, बंगळुरुची भारतीय विज्ञान संस्था (IISC) आणि विशाखापट्टणमची नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा या संस्थांमधील तज्ञ सदस्यांची एक समिती नेमण्यात आली आहे.
खालील वाहन उत्पादकांनी आपली वाहने परत मागवली आहेत:
- ओकिनावा ने 16 एप्रिल 2022 रोजी, 3215 वाहने परत मागवली आहेत.
- प्युअर ईव्ही ने, 21 एप्रिल 2022 रोजी 2000 वाहने, परत मागवली आहेत.
- ओला इलेक्ट्रिक ने 23 एप्रिल 2022 रोजी 1441 इलेक्ट्रिक वाहने परत मागवली आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांच्या तपासण्या निश्चित मापदंडानुसार केल्या जातात. केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989 च्या 126 नियमात, हे मापदंड स्पष्टपणे मांडण्यात आले आहेत.
केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.
* * *
S.Patil/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1847491)
आगंतुक पटल : 184