पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
चौथ्या ओएनजीसी पॅरा क्रीडास्पर्धा 2022चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते उद्घाटन
केंद्रीय तेल आणि वायू सार्वजनिक उपक्रमांमधील सुमारे 275 दिव्यांग कर्मचारी या क्रीडास्पर्धांमध्ये सहभागी होणार
Posted On:
02 AUG 2022 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2022
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज नवी दिल्लीतील त्यागराज क्रीडा संकुलात चौथ्या ओएनजीसी पॅरा क्रीडास्पर्धांचे उद्घाटन केले.तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ओएनजीसी) द्वारे या क्रीडा स्पर्धा 2-4 ऑगस्ट 2022 दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. आठ केंद्रीय तेल आणि वायू सार्वजनिक उपक्रमांमधील 275 दिव्यांग कर्मचारी या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत.
"ओएनजीसी पॅरा क्रीडास्पर्धा या तेल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयांतर्गत असलेल्या सार्वजनिक उपक्रमांमध्ये कार्यरत मनुष्यबळामध्ये सर्वसमावेशकता आणि समानता आणण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ आहे.", असे हरदीप सिंह पुरी यांनी चौथ्या ओएनजीसी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करताना सांगितले.
विशेषत: दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ओएनजीसीने संकल्पना मांडल्यानंतर 2017 मध्ये या पॅरा क्रीडा स्पर्धांची सुरुवात झाली. या क्रीडा स्पर्धांची व्याप्ती वाढवण्यासाठी,गांधीनगर येथे आयोजित तिसऱ्या भव्य ओएनजीसी पॅरा क्रीडास्पर्धांमध्ये आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल, ईआयएल, ओआयएल आणि जीएआयएलमधील खेळाडूंनाही ओएनजीसीने सहभागी करून घेतले होते. या सध्याच्या चौथ्या क्रीडा स्पर्धांमध्ये , ओएनजीसीतील 192 कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त, आयओसीएल (21), जीएआयएल (15), बीपीसीएल (13), एमआरपीएल (11), ईआयएल (9), ओआयएल (8) आणि एचपीसीएल (6)या इतर सात सार्वजनिक उपक्रमांमधील कर्मचारी सहभागी होणार आहेत.
ओएनजीसीने 2017 मध्ये भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या मदतीने आंतरराष्ट्रीय स्वरूपानुसार पॅरा क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये ओएनजीसीमधील 120 दिव्यांग कर्मचाऱ्यांनी ऍथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि व्हीलचेअर शर्यत यासारख्या खेळांमध्ये भाग घेतला.तेव्हापासून या स्पर्धांमधील सहभाग आणि विविधता उत्तरोत्तर वाढत गेली.ओएनजीसी पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या अनेक पॅरा-खेळाडूंनी पॅरालिम्पिकमध्येही भारताचे नाव उंचावले आहे.
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1847482)
Visitor Counter : 159