अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एकाच दिवशी 72.42 लाखांपेक्षा जास्त आयकर विवरणपत्र दाखल करण्याचा नवीन विक्रम


31 जुलै 2022 पर्यंत सुमारे 5.83 कोटी विवरणपत्रं झाली दाखल

Posted On: 01 AUG 2022 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑगस्‍ट 2022

 

करदाते आणि कर व्यावसायिकांनी वेळेचे पालन करत आयकर परतावा भरला, त्यामुळे प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरण्यात वाढ झाली, परिणामी एकाच दिवशी विक्रमी आयटीआर दाखल करण्यात आले. आयकर विभागाने याबद्दल करदाते आणि कर व्यावसायिकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

31 जुलै 2022 या दिवशी (पगारदार करदात्यांची आणि इतर गैर कर लेखापरीक्षण प्रकरणांची देय तारीख) आयटीआर दाखल करण्यात वाढ होऊन एकाच दिवशी म्हणजे 31 जुलै, 2022 रोजी 72.42 लाखांहून अधिक आयटीआर दाखल केले गेले. मूल्यांकन वर्षे 22-23 साठी 31 जुलै 2022 पर्यंत दाखल केलेले एकूण आयटीआर सुमारे 5.83 कोटी आहेत. ई-फायलिंग पोर्टलने देखील 31 जुलै 2022 रोजी नवे मानक निर्धारित केले. या दिवशी आयटीआर फाइलिंगचा सर्वोच्च वेग प्रति सेकंद : 570 (4:29:30 वाजता), आयटीआर फाइलिंगचा सर्वोच्च वेग प्रति मिनिट : 9573 (संध्याकाळी 7:44 वाजता) ), आणि आयटीआर फाइलिंगचा सर्वोच्च वेग प्रति तास : 5,17,030, (संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 6 दरम्यान) इतका नोंदवला गेला.

मूल्यांकन वर्ष 22-23 साठीचे पहिले 1 कोटी आयटीआर 7 जुलै, 2022 पर्यंत दाखल झाल्यामुळे ई-फायलिंगची सुरुवातीची गती तुलनेने खूपच कमी होती. 22 जुलै, 2022 पर्यंत सुमारे 2.48 कोटी आयटीआर दाखल करण्यात आल्याने ही गती किरकोळ वाढली. देय तारखेला कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे सरकारने जाहीर केल्याने, आयटीआर भरण्यात मोठी वाढ झाली आणि 25 जुलै 2022 पर्यंत 3 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले. 31 जुलै, 2022 रोजी दिवसअखेर मागील सर्व विक्रम मोडीत काढत 72.42 लाख आयटीआर दाखल केले गेले. (2019 मध्ये कमाल 49 लाख आयटीआर दाखल झाले होते) एकट्या जुलै 2022 मध्ये 5.13 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले आहेत.

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1847176) Visitor Counter : 413


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu