पोलाद मंत्रालय
हर घर तिरंगा अभियानात एनएमडीसीचा सहभाग
Posted On:
01 AUG 2022 9:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2022
भारतातील लोहखनिजाचे सर्वात मोठे उत्पादक असलेल्या एनएमडीसी अर्थात राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाने भारत सरकारच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाच्या अनुषंगाने हर घर तिरंगा अभियान सुरू केले आहे. खाण क्षेत्रातील प्रमुख कंपनीने गलवान खोऱ्यात देशासाठी बलिदान दिलेल्या महावीर चक्र पुरस्कार विजेते कर्नल बी संतोष बाबू यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या शौर्याचा गौरव केला. एनएमडीसीने कर्नल बी संतोष बाबू यांचे आई-वडील मंजुळा आणि बिक्कुमल्ला उपेंदर यांना याप्रसंगी सन्माननीय पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.
हर घर तिरंगा अंतर्गत सन्माननीय पाहुण्यांनी एनएमडीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुमित देब यांच्याकडे राष्ट्रध्वज सुपूर्द केला आणि देब यांनी त्यांना तिरंगा देऊन त्यांचा सन्मान केला. सुमित देब यांच्यासह एनएमडीसीचे संचालक (वित्त) अमिताव मुखर्जी आणि मुख्य दक्षता अधिकारी बी. विश्वनाथ (IRSS) यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांना राष्ट्रध्वज सुपूर्द केला आणि 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान प्रत्येकाने आपापल्या घरी तिरंगा फडकावण्यासाठी प्रोत्साहित केले.
आपल्या भाषणात मंजुळा यांनी आपल्या मुलाच्या शौर्याच्या आणि पराक्रमाच्या कथा सांगितल्या आणि म्हणाल्या, “मी माझ्या मुलाला देशाच्या सर्वोच्च सेवेसाठी तयार केले. तो सेवेत असताना जेव्हा मी त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल चिंता व्यक्त केली तेव्हा बाबू नेहमी ‘राष्ट्र प्रथम ' असे म्हणायचा. “माझा मुलगा एक असाधारण अधिकारी होता. मरेपर्यंत देशाची सेवा करण्याच्या त्याच्या समर्पित भावनेमुळे हा गौरव मिळाला आहे आणि ही भावना आपल्या देशातील तरुणांपर्यंत पुढे न्यायला हवी” असे बिक्कुमल्ला उपेंदर म्हणाले.
यावेळी सुमित देब म्हणाले, “अमर जवान कर्नल बी संतोष बाबू यांच्या कुटुंबासोबत हर घर तिरंगा साजरा करणे हा एनएमडीसीचा सन्मान आहे. आपल्या तिरंग्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. खनिज भवनात दररोज आपला राष्ट्रध्वज फडकवला जातो. केशरी रंगामुळे खाणीना प्रेरणा मिळते, समाजासाठी आमचे कार्य पांढर्या रंगाने प्रेरित आहे तर राष्ट्र उभारणीप्रति आमची वचनबद्धता हिरव्या रंगातून येते. मी एनएमडीसी कुटुंबाला विनंती करतो की त्यांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या घरी तिरंगा फडकवण्यात मनापासून सहभागी व्हावे."
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1847168)
Visitor Counter : 131