सांस्कृतिक मंत्रालय

हर घर तिरंगा मोहिमेबद्दल लोकांना जागरुक करण्यासाठी मीनाक्षी लेखी यांनी 40 एलईडी व्हॅनना दाखवला हिरवा झेंडा

Posted On: 01 AUG 2022 9:38PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑगस्‍ट 2022

 

हर घर तिरंगा मोहिमेला चालना देण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी आज नवी दिल्लीत 40 एलईडी व्हॅनना हिरवा झेंडा दाखवला.

 

13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी ध्वजवंदन करून हर घर तिरंगा मोहिमेत सक्रीय सहभागी होण्यासाठी मीनाक्षी लेखी यांनी यावेळी जनतेला प्रेरित केले.

"हर घर तिरंगा मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुरू केली आणि आम्ही या मोहिमेबद्दल लोकांना जागरुक करण्यासाठी व्हिडिओ व्हॅन रवाना केल्या" असे केंद्रीय मंत्री म्हणाल्या. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी, देशभक्तीची भावना दृढ करण्यासाठी आणि भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्तीनिमित्त सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात लोकसहभाग सुनिश्चित करण्यासाठी या मोहिमेत उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन मीनाक्षी लेखी यांनी केले.

"आपण जे काही करतो, त्याची प्रेरणा नेहमीच तिरंगा असते आणि तो आपल्या तनामनात आहे आणि आपण त्यासाठी प्राणार्पण करू शकतो " असेही केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.

संपूर्ण दिल्लीभर भ्रमण करून हर घर तिरंगा मोहीम आणि अमृत महोत्सवाची माहिती या  व्हॅन देणार आहेत. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडिअमवर 2 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या तिरंगा उत्सवाशी संबंधित माहितीही या व्हॅनद्वारे प्रदर्शित करण्यात येणार आहे.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1847166) Visitor Counter : 109


Read this release in: English , Urdu , Hindi