नौवहन मंत्रालय

मध्य आशियाई  बाजारपेठांना जोडणाऱ्या आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक  मार्गिका (आयएनएसटीसी) संलग्न चाबहारला प्रोत्साहन देण्यासाठी चाबहार दिन साजरा

Posted On: 31 JUL 2022 4:04PM by PIB Mumbai

 

मध्य आशियाई  बाजारपेठांना जोडणाऱ्या आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक  मार्गिका (आयएनएसटीसी) संलग्न चाबहारच्या प्रोत्साहनासाठी  आज मुंबईत बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने, इंडिया पोर्ट्स ग्लोबलच्या सहकार्याने चाबहार दिवससाजरा केला. रशिया, युरोप आणि मध्य आशियाई बाजारपेठेत प्रवेश करताना मालाच्या आयात निर्यातीसाठी  लागणारा वेळ कमी करण्यासाठी आयएनएसटीसी (आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक  मार्गिका) हा भारताचा  दृष्टीकोन  आणि उपक्रम आहे. इराणमध्ये असलेले चाबहार बंदर हे या प्रदेशाचे आणि विशेषतः मध्य आशियाचे व्यापारी वाहतूक  केंद्र आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0014CTP.jpg

केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री  सर्बानंद सोनोवाल,केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग  राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक,कझाकस्तान प्रजासत्ताक, किरगिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तानचे राजदूत, इराणची बंदरे आणि सागरी संस्थेच्या बंदर आणि आर्थिक व्यवहार विभागाचे उपप्रमुख  जलील इस्लामी, अफगाणिस्तानच्या   महावाणिज्यदूत झकिया वारडॅक, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे महावाणिज्यदूत  ए. एम. अलीखानी , मसूद ओस्ताद होसेन या या कार्यक्रमाला उप्स्त्जीत होते.

चाबहार येथील शाहिद बेहेश्ती बंदराला  मालवाहतुकीचे केंद्र  बनवणे आणि मध्य आशियाई देशांपर्यंत पोहोचण्यासाठी या बंदराला आयएनएसटीसीशी जोडणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे सर्बानंद सोनवाल यांनी आपल्या भाषणात सांगितले.  चाबहार मुक्त व्यापार क्षेत्र आणि  शाहीद बेहेश्ती  बंदराचे प्रोत्साहन यांचा  फायदा  व्यवसाय आणि लॉजिस्टिक कंपन्यांना होईल यादृष्टीने आम्ही उत्सुक आहोत. वाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी करण्याच्या दृष्टीनेभारतापासून इराण आणि मध्य आशियापर्यंत स्वस्त, कमी अंतराचा , जलद आणि अधिक विश्वासार्ह मार्ग बनवण्यासाठी सूचना द्याव्यात असे आवाहन सर्व प्रतिनिधी आणि संबंधितांना सोनोवाल यांनी केले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002FIZF.jpg

या कार्यक्रमादरम्यान, मध्य आशियाई देशांतील प्रतिनिधींनीआंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक  मार्गिका चाबहारशी जोडल्यामुळे त्यांच्या प्रदेशात आयात निर्यात व्यापार वाढवण्यात आणि चहुबाजूनी केवळ भूवेष्टित असलेल्या   देशांमधील विकासाला आणखी चालना देण्यासाठी त्याची क्षमता कशाप्रकारे  महत्त्वाची भूमिका बजावू शकते यावर प्रकाश टाकला.दिवसभर चाललेल्या कार्यक्रमादरम्यान, अनेक सादरीकरणे आणि सरकार ते व्यवसाय सत्रे झाली.

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1846749) Visitor Counter : 226


Read this release in: Hindi , English , Urdu , Tamil , Telugu