कृषी मंत्रालय

कृषी पायाभूत सुविधा निधी राज्यांना शेती समृध्द करण्यासाठी चांगली संधी देणार, नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केला  विश्वास


केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते कृषी पायाभूत सुविधा पुरस्कारांचे  वितरण

Posted On: 30 JUL 2022 9:15PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत सुरु केलेला कृषी पायाभूत सुविधा निधी (एआयएफ) नवीन टप्पे गाठत असल्याचे  केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज सांगितले. खेड्यांचे सबलीकरण करून आणि खासगी गुंतवणुकीला चालना देऊन कृषी पायाभूत सुविधांची उणीव भरून काढण्यामधील एआयएफची भूमिका अधोरेखित करत तोमर म्हणाले की, कृषी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, कृषी निर्यात वाढवण्यासाठी, कृषी क्षेत्राला रोजगारक्षम बनवण्यासाठी आणि नवीन पिढीला कृषी क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा निधीची योजना करण्यात आली आहे. तोमर आज नवी दिल्ली मध्ये आयोजित पायाभूत सुविधा निधी पुरस्कार समारंभाला संबोधित करत होते.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0013FFP.jpg 

आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत कृषी आणि संलग्न  क्षेत्रामध्ये 1.5 कोटी रुपयांहून जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे. कृषी क्षेत्राच्या विकासाकरता राज्ये आणि बँकांनी एकत्रितपणे या रकमेचा उपयोग करायला हवा. राज्यांना कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या पतपुरवठयातील कमी  भरून काढण्याची ही उत्तम संधी आहे. राज्य सरकारांनी त्याचा उपयोग शेती मजबूत आणि समृद्ध करण्यासाठी केला पाहिजे, ज्यामुळे देशाचा विकास वेगाने होईल, ते म्हणाले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002V2WO.jpg 

तुम्हाला जर या क्षेत्रात पुढे जायचे असेल, तर आव्हाने ओळखून त्यावर मात करावी लागेल. देशात 86 टक्के छोटे शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, तर देशाची 55 ते 60 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेली आठ वर्ष कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी सातत्त्याने प्रयत्न केले जात आहेत. तोमर म्हणाले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003N1MR.jpg

तोमर यांनी या कार्यक्रमात कृषी पायाभूत सुविधा निधीया केंद्रीय क्षेत्र योजने अंतर्गत अर्थपुरवठा करण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल बँका आणि राज्य सरकारांचा गौरव करण्यासाठी विविध श्रेणींतील  पुरस्कार प्रदान केले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image007PSDN.jpg

***

S.Kakade/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1846582) Visitor Counter : 145


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu