श्रम आणि रोजगार मंत्रालय
उद्योगातल्या कामगारांसाठीचा ग्राहक दर निर्देशांक ( 2016 =100 ) -जून 2022
Posted On:
30 JUL 2022 3:15PM by PIB Mumbai
कामगार आणि स्वयंरोजगार कार्यालयाशी निगडित कामगार विभाग प्रत्येक महिन्याला उद्योगांमध्ये असणाऱ्या कामगारांशी निगडित ग्राहक दर निर्देशांक दर महिन्याला संकलित करत असतो. देशातल्या प्रमुख 88 उद्योग केंद्रातल्या 317 बाजारातलील किरकोळ दर लक्षात घेऊन हा निर्देशांक जाहीर केला जातो. हा निर्देशांक 88 केंद्र आणि संपूर्ण भारतासाठी संकलित केला जातो आणि तो पाठोपाठच्या महिन्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध केला जातो केला. या प्रसिद्धी पत्रकात जून 2022 महिन्याचा निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे.
ऑल इंडिया सीपीआय आय डब्ल्यू CPI-IW जून 2022 निर्देशांक 0.2 अंकांनी वाढला असून हा 129.2 अंकांवर स्थिर आहे. एक महिन्याच्या प्रमाण बदलानुसार, हा निर्देशांक गेल्या महिन्याच्या तुलनेत 0.16 % ने वधारला आहे.गेल्या वर्षीच्या याच दोन महिन्यातला तुलनात्मक अभ्यास करता निर्देशांक 0.91 टक्क्यांनी वधारला आहे.
चालू निर्देशांकात झालेली ही उच्चतम वाढ, ही खाद्य आणि पेय या, गटांमुळे झालेली दिसून येत असून ती एकूण बदलाच्या 0.20% एवढी आहे. खाद्यपदार्थ स्तरावर बटाटे, कांदे, टोमॅटो, कोबी, सफरचंद, केळी, बदाम, सुकी मिरची, ताजे मासे, पोल्ट्री, चिकन, वडा, इडली डोसा, तयार खाद्यपदार्थ, स्वयंपाकाचा गॅस, रॉकेल आणि घरगुती वीज इत्यादींमध्ये झालेली वाढ ही या निर्देशांक वाढीला जबाबदार आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने वाहनांसाठी लागणारे पेट्रोल, तांदूळ, आंबे, हिरवी मिरची, लिंबू, भेंडी, पडवळ, अननस, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल यांचे भाव काही प्रमाणात घसरल्याने निर्देशांकात काही प्रमाणात घट दिसून आली.
वर्ष दर वर्षानुसार या महिन्याचा निर्देशांक 6.16% वर आहे जो गेल्या महिन्यात सहा 6.97% होता आणि तो गेल्या वर्षीच्या याच महिन्यात 5.57% नोंदला गेला होता.त्याचप्रमाणे खाद्य महागाई दर हा 6.73% आहे जो गेल्या महिन्यात 7.92% वर होता. गेल्या वर्षी याच महिन्यात तो 5.61% होता.
Y-o-Y Inflation based on CPI-IW (Food and General)

All-India Group-wise CPI-IW for May, 2022 and June, 2022
Sr. No.
|
Groups
|
May, 2022
|
June, 2022
|
I
|
Food & Beverages
|
129.5
|
130.0
|
II
|
Pan, Supari, Tobacco & Intoxicants
|
144.7
|
144.4
|
III
|
Clothing & Footwear
|
126.5
|
127.0
|
IV
|
Housing
|
118.9
|
118.9
|
V
|
Fuel & Light
|
169.7
|
172.8
|
VI
|
Miscellaneous
|
126.4
|
125.9
|
|
General Index
|
129.0
|
129.2
|
CPI-IW: Groups Indices

या पुढचा, जुलै 2022 या महिन्याचा सीपीआय -आयडब्ल्यू CPI-IW निर्देशांक हा बुधवारी 31 ऑगस्ट 2022 ला प्रकाशित होणार आहे आणि हा निर्देशांक आपल्यासाठी कार्यालयाच्या www.labourbureaunew.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.
***
S.Patil/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1846478)
Visitor Counter : 215