आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
देशात अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार
राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमांतर्गत जैव -सामग्री केंद्रांच्या स्थापनेसाठी राज्यांना आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद
Posted On:
29 JUL 2022 7:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जुलै 2022
देशभरात अवयव दान आणि प्रत्यारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारचा राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम (NOTP) आहे. या कार्यक्रमांतर्गत आर्थिक सहाय्य समाविष्ट असलेल्या तरतुदी खालीलप्रमाणे:
- प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशात राज्य अवयव आणि ऊती (tissue) प्रत्यारोपण संस्था (SOTTOs) स्थापन करणे.
- राष्ट्रीय/प्रादेशिक/राज्य जैव-सामग्री केंद्रांची स्थापना;
- नवीन अवयव प्रत्यारोपण/पुनर्प्राप्ती सुविधांची स्थापना करणे आणि विद्यमान अवयव प्रत्यारोपण/पुनर्प्राप्ती सुविधांचे बळकटीकरण.
- वैद्यकीय महाविद्यालये आणि ट्रॉमा सेंटरमध्ये प्रत्यारोपण समन्वयकांची तरतूद.
- मृत दात्याच्या शरीराची देखभाल
- मृत दात्याचे सन्मानाने अंत्यसंस्कार
- दारिद्र्यरेषेखालील रूग्णांना प्रत्यारोपणानंतर रोगप्रतिकारक औषधे.
या कार्यक्रमांतर्गत, नवी दिल्ली येथे सर्वोच्च स्तरावरील राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्था (NOTTO), पाच प्रादेशिक अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्था (ROTTOs) आणि सोळा राज्य अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्था (SOTTOs) स्थापन करण्यात आल्या आहेत.
हृदय, मूत्रपिंड, यकृत इत्यादी अवयव पुनर्प्राप्त झाल्यानंतर लगेच प्रत्यारोपण करणे आवश्यक असते. राष्ट्रीय अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्थेत (NOTTO) ऊती साठवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील ऊती बँकेची (जैव सामग्री केंद्र) सुविधा आहे. राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम (NOTP) अंतर्गत, राज्यांना जैव-सामग्री केंद्र स्थापन करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या चेन्नई इथे प्रादेशिक अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्थेत (ROTTO) प्रादेशिक जैव-सामग्री केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच, राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमांतर्गत जैव-सामग्री केंद्र स्थापन करण्यासाठी बिहार आणि महाराष्ट्र राज्यांना निधी वितरित करण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.
Year
|
Number of kidneys Transplanted from deceased donors
|
Number of kidneys Transplanted from Living donors
|
Total Number of kidneys Transplanted
|
2019
|
1153
|
8613
|
9766
|
2020
|
532
|
4970
|
5502
|
2021
|
818
|
8254
|
9072
|
* * *
R.Aghor/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1846316)