वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जून- 2022 मध्ये आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकात 12.7 टक्के वाढ

Posted On: 29 JUL 2022 7:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जुलै 2022

 

जून 2021 च्या निर्देशांकाच्या तुलनेत आठ प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात 12.7 टक्क्यांनी (प्राथमिक) वाढ झाली आहे. गेल्यावर्षी, याच कालावधीच्या तुलनेत जून 2022 मध्ये कोळसा, सिमेंट, वीज, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद आणि नैसर्गिक वायू उद्योगांच्या उत्पादनात वाढ झाली आहे.  

आय सी आय (ICI) ही संस्था निवडक आठ प्रमुख उद्योगांमधील उत्पादनाच्या एकत्रित आणि वैयक्तिक कामगिरीची नोंद ठेवते. उदाहरणार्थ. कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (IIP) समाविष्ट केलेल्या एकूण वस्तूंपैकी 40.27 टक्के भार आठ प्रमुख उद्योगांचा आहे. वार्षिक आणि मासिक निर्देशांक आणि वाढीचा तपशील अनुक्रमे परिशिष्ट I आणि II मध्ये दिलेला आहे.

आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकाचा अंतिम वाढीचा दर मार्च 2022 मध्ये त्याच्या तात्पुरत्या पातळीच्या 4.3% वरून 4.8% वर संशोधित करण्यात आला आहे. एप्रिल-जून 2022-23 मध्ये ICI चा वाढीचा दर गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 13.7% (P) होता.

आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकाचा सारांश खाली दिला आहे:

  • कोळसा: कोळसा उत्पादन जून- 2021 च्या तुलनेत जून- 2022 मध्ये 31.1 टक्क्यांनी वाढले. त्याचा संकलित निर्देशांक एप्रिल ते जून 2022-23 या कालावधीत, मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 31.2 टक्क्यांनी वाढला.
  • कच्चे तेल: कच्च्या तेलाच्या उत्पादनात जून- 2021 च्या तुलनेत जून- 2022 मध्ये 1.7 टक्क्यांनी घट झाली. त्याचा संकलित निर्देशांक एप्रिल ते जून 2022-23 या कालावधीत, मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 0.6 टक्क्यांनी वाढला.
  • नैसर्गिक वायू: नैसर्गिक वायूचे उत्पादन जून- 2022 मध्ये जून- 2021 च्या तुलनेत 1.2 टक्क्यांनी वाढले. त्याचा संकलित निर्देशांक एप्रिल ते जून 2022-23 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 4.8 टक्क्यांनी वाढला.
  • पेट्रोलियम रिफायनरी उत्पादने: पेट्रोलियम रिफायनरी उत्पादन जून -2022 मध्ये जून- 2021 च्या तुलनेत 15.1 टक्क्यांनी वाढले. मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत एप्रिल ते जून 2022-23 या कालावधीत त्याचा संकलित निर्देशांक 13.5 टक्क्यांनी वाढला.
  • खते: खतांचे उत्पादन जून- 2022 मध्ये जून- 2021 च्या तुलनेत 8.2 टक्क्यांनी वाढले. त्याचा संकलित निर्देशांक एप्रिल ते जून, 2022-23 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 13.2 टक्क्यांनी वाढला.
  • पोलाद: पोलाद उत्पादन जून- 2022 मध्ये जून- 2021 च्या तुलनेत 3.3 टक्क्यांनी वाढले. त्याचा संकलित निर्देशांक एप्रिल ते जून, 2022-23 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 6.6 टक्क्यांनी वाढला.
  • सिमेंट: सिमेंट उत्पादन जून- 2022 मध्ये जून- 2021 च्या तुलनेत 19.4 टक्क्यांनी वाढले. त्याचा संकलित निर्देशांक एप्रिल ते जून, 2022-23 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 17.1 टक्क्यांनी वाढला.
  • वीज: वीज निर्मिती जून- 2022 मध्ये जून- 2021 च्या तुलनेत 15.5 टक्क्यांनी वाढली. त्याचा संकलित निर्देशांक एप्रिल ते जून, 2022-23 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 16.8 टक्क्यांनी वाढला.

 

* * *

R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1846310) Visitor Counter : 176


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri