कायदा आणि न्याय मंत्रालय

न्याय मित्र योजना

Posted On: 29 JUL 2022 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जुलै 2022

 

देशातील उच्च न्यायालये तसेच दुय्यम न्यायालयांमध्ये 10 ते 15 वर्ष प्रलंबित राहिलेल्या जुन्या प्रकरणांचा जलद निपटारा करण्याच्या उद्देशाने न्याय मित्र उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. वर्ष 2017 मध्ये न्याय मित्र कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत महाराष्ट्र, आसाम, बिहार, कर्नाटक,ओदिशा,राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये एकूण 38 न्याय मित्रांची नेमणूक करण्यात आली असून त्याचे तपशील परिशिष्ट-अ मध्ये दिले आहेत. वैवाहिक वाद, अपघात दावे यांसह गुन्हेगारी प्रकरणांचा देखील समावेश असलेले 3495 जुने खटले निकाली काढण्यात न्याय मित्रांनी संबंधित न्यायालयांना मदत केली आहे. निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश निहाय तपशील परिशिष्ट – ब मध्ये दिले आहेत.देशभरात वर्ष 2021 ते 26 या कालावधीत 80 न्याय मित्रांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यापैकी, वर्ष 2021-22 साठी एप्रिल 2022 मध्ये 11 विविध जिल्हा न्यायालयांमध्ये 11 न्याय मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे.

परिशिष्ट -अ

A State-wise Statement containing number of Nyaya Mitra engaged from 2017-2022

S.No

State

Year

2017-2018

Year

2018-2019

Year

2019-2020

Year

2020-2021

Year

2021-2022

Total

1

Assam

      -

-

-

 

NIL*

02

02

2

Bihar

01

-

-

-

01

3

Karnataka

-

-

-

01

01

4

Maharashtra

-

-

03

01

04

5

Odisha

 

 

02

02

04

6

Rajasthan

04

03

02

01

10

7

Uttar Pradesh

05

-

01

02

08

8

West Bengal

04

01

01

02

09

 

Total

14

04

09

11

38

*कोविड महामारीमुळे वर्ष 2020-2021 मध्ये न्यायालये बंद ठेवण्यात आली तसेच सामाजिक अंतर पालनाची नियमावली लागू करण्यात आल्यामुळे त्या वर्षात एकाही न्यायमित्राची नेमणूक करण्यात आली नाही.

परिशिष्ट -ब

A State-wise Statement containing number of cases disposed by Nyaya Mitra (2017-2022)

S.No

State

No. of cases disposed

 (2017-2022)

1

Assam

8

2

Bihar

44

3

Karnataka

0

4

Maharashtra

327

5

Odisha

818

6

Rajasthan

1691

7

Uttar Pradesh

461

9

West Bengal

28

 

Grand Total

3495

 

वर्ष 2017 ते 22 या कालावधीत महाराष्ट्रात एकूण 4 न्यायमित्रांची नेमणूक करण्यात आली असून न्याय मित्रांच्या मदतीने या काळात महाराष्ट्रातील 327 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.

केंद्रीय कायदे आणि न्याय मंत्री किरेन रिजीजू यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली

 

* * *

R.Aghor/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1846272) Visitor Counter : 231


Read this release in: Odia , English , Urdu