महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मासिक पाळीच्या काळातील स्वच्छतेबद्दल जागरूकतेसाठी योजना

Posted On: 29 JUL 2022 3:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जुलै 2022

 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय 2011 पासून 10-19 वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी योजना राबवत आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर आधारित राज्य कार्यक्रम अंमलबजावणी योजनेच्या (पीआयपी) माध्यमातून  राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे या योजनेला पाठबळ दिले जाते. (i) पौगंडावस्थेतील मुलींमध्ये मासिक पाळीच्या काळात करायच्या स्वच्छतेबाबत जागरूकता वाढवणे; (ii) पौगंडावस्थेतील मुलींना उत्तम  दर्जाच्या सॅनिटरी नॅपकिन्सची उपलब्धता  आणि त्याचा वापर वाढवणे आणि (iii) पर्यावरणस्नेही  पद्धतीने सॅनिटरी नॅपकिन्सची सुरक्षित विल्हेवाट लावणे ही या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. या  योजनेंतर्गत, मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्यांकडून (आशा) किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे पाकीट 6 रुपये प्रति पाकीट या अनुदानित दराने उपलब्ध करून दिले जाते.

तसेच, सॅनिटरी नॅपकिन्स आणि चांगल्या दर्जाची औषधे परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध व्हावी हे सुनिश्चित करण्यासाठी , रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत असलेला औषोधोत्पादन  विभाग  प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेची  (पीएमबीजेपी) अंमलबजावणी करत आहे,महिलांसाठी आरोग्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे एक महत्वाचे  पाऊल आहे. या प्रकल्पांतर्गत,देशभरात स्थापन करण्यात आलेली 8700 हून अधिक जनऔषधी केंद्रे, जैव विघटनशील असलेले 'सुविधा' नावाचे ऑक्सो-बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन केवळ 1/- रुपया  प्रति पॅड दराने उपलब्ध करून देतात.  

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

R.Aghor/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1846224) Visitor Counter : 262


Read this release in: English , Urdu , Telugu