शिक्षण मंत्रालय
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या द्विवर्ष पुर्तीनिमित्त केंद्रीय मंत्री अमित शाह करणार शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा शुभारंभ
Posted On:
28 JUL 2022 7:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जुलै 2022
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020,च्या द्विवर्ष पुर्तीनिमित्त शिक्षण क्षेत्र आणि कौशल्य विकास क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा 29 जुलै 2022 रोजी केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकासमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे.
यावेळी शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार, अन्नपूर्णा देवी, राजकुमार रंजन सिंह आणि कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर हे देखील उपस्थित राहणार आहेत.
नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात हा कार्यक्रम आयोजित केला असून तो यूट्यूब आणि शिक्षण मंत्रालयाच्या सोशल मिडिया हॅण्डलवर पाहता येईल.
या कार्यक्रमात शिक्षण आणि कौशल्य विकासाशी निगडीत डिजिटल शिक्षण, नवोन्मेष, शिक्षण आणि कौशल्य विकासाचा समन्वय, शिक्षक प्रशिक्षण आणि मुल्यांकन अशा सर्व विषयांचा समावेश असेल.
या व्यतिरिक्त, या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्यवरांची भाषणे देखील होणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीच्या प्रवासातल्या विविध पैलूंवरही यात चर्चा होईल.
* * *
N.Chitale/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1845958)
Visitor Counter : 184