ग्रामीण विकास मंत्रालय

ग्रामीण रस्त्यांचा विकास

Posted On: 27 JUL 2022 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जुलै 2022

 

2001 च्या जनगणनेनुसार नियोजित लोकसंख्येच्या पात्र दुर्लक्षित अधिवास सर्व  हवामानामध्ये अनुकूल अशा रस्त्याने जोडण्यासाठी एक विशेष मोहीम म्हणून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा पहिला टप्पा (PMGSY-I) वर्ष 2000 मध्ये लागू करण्यात  आला होता.

विविध राज्यातले आणि केंद्रशासित प्रदेशातले निवडक मार्ग आणि महत्वाच्या ग्रामीण जोडणीसाठी(MRLs) 50 हजार किलोमीटर रस्त्यांची सुधारणा करण्याचं उद्दिष्ट ठेवून वर्ष 2013 मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा दुसरा टप्पा घोषित करण्यात आला. 

त्याचप्रमाणे वर्ष 2016 मध्ये  देशाच्या नक्षल प्रभावित  प्रदेशात(RCPLWEA) रस्ते बांधणी आणि रस्ते सुधारणेसाठी, विशेषतः महत्त्वाच्या रस्त्यांसाठी रस्ते जोडणी प्रकल्प हाती घेण्यात आला. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत स्वतंत्र भाग म्हणून राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पात नऊ राज्यातल्या 44 अति नक्षल प्रभावित  (LWE)जिल्हे आणि काही  बाजूच्या जिल्ह्यांचा समावेश होता. 

वर्ष 2019 मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा तिसरा टप्पा लागू केला.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून 21 जुलै 2022 पर्यंत तब्बल 7लाख 93 हजार 568 किलोमीटर लांबीचे 1लाख 84 हजार 56 रस्ते, आणि 10 हजार 82 पूल यासाठी मंजुरी देण्यात आली.  त्यापैकी 7लाख 12 हजार 638 किलोमीटर लांबीचे 1 लाख 70 हजार 857 रस्ते आणि  7 हजार 264 पूल बांधून पूर्ण करण्यात आले.

ही माहिती केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.
 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1845667) Visitor Counter : 267


Read this release in: English , Urdu , Telugu