गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयांची केली प्रशंसा
Posted On:
27 JUL 2022 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जुलै 2022
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयांची प्रशंसा केली आहे. ट्विटच्या मालिकेत अमित शाह म्हणाले, “सर्वांसाठी कनेक्टिव्हिटी ही मोदी सरकारची प्राथमिकता आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने दूरस्थ आणि दुर्गम भागातील 24,680 वंचित गावांमध्ये 4G मोबाइल सेवा प्रदान करण्यासाठी एकूण 26,316 कोटी रुपये खर्चाच्या 4G मोबाइल सेवांच्या परिपूर्णतेसाठीचा प्रकल्प मंजूर केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “आणखी एका महत्त्वाच्या निर्णयात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बीएसएनएलच्या 1.64 लाख कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंजुरी दिली. यामुळे भारतीय संचार निगम लिमिटेडला त्यांच्या विद्यमान सेवांचा दर्जा सुधारण्यास, 4G सेवा सुरू करण्यास आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होण्यास मदत होईल.”
शाह म्हणाले की, “भारत ऑक्टोबर 2022 मध्ये प्रथमच 17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिफा विश्व चषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी हमीपत्रांवर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे फुटबॉल खेळण्यासाठी अधिकाधिक मुलींना नक्कीच प्रेरणा मिळेल आणि क्रीडा नेतृत्वात त्यांचे प्रतिनिधित्व वाढेल.”
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1845660)
Visitor Counter : 202