अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रमुख जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या स्थितीवर सरकारचे नियमित लक्ष महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारतर्फे पुरवठ्याच्या संदर्भातील विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत

प्रविष्टि तिथि: 26 JUL 2022 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जुलै 2022

 

प्रमुख जीवनावश्यक वस्तूंच्या दरांच्या परिस्थितीवर सरकार नियमितपणे लक्ष ठेवून आहे आणि त्यासंदर्भात वेळोवेळी आवश्यक सुधारात्मक उपाय करण्यात येत आहेत. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरवठ्याच्या संदर्भातील विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

या संदर्भात अधिक तपशील देताना, राज्यमंत्री म्हणाले की केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोलवरील अबकारी कर  प्रती लिटर 8 रुपयांनी आणि डिझेलवरील अबकारी कर  प्रती लिटर 6 रुपयांनी कमी केला. तसेच, डाळींवरील आयात शुल्क आणि अधिभार कमी करणे, खाद्यतेले आणि तेल बिया यांच्या साठ्यावरील मर्यादा आणि त्यांचे दर यांचे सुसूत्रीकरण करणे, कांदे आणि डाळी यांच्या राखीव साठ्याची व्यवस्था करणे, 30 जून 2022 पर्यंत अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 च्या कक्षेत जीवनावश्यक वस्तू म्हणून सोया मीलचा समावेश करणे आणि  30 जून 2022 पर्यंत सोया मीलच्या साठ्यावर मर्यादा घालणे इत्यादी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  

केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की वस्तूंच्या सतत वाढत्या दरांमुळे आणि महामारीच्या कारणाने निर्माण झालेल्या पुरवठा-मागणी यांच्यातील असमतोलामुळे भारतासह जगभरात महागाई वाढली. रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्षाचा परिणाम म्हणून कच्चे तेल, वायू आणि धातू यांच्यावर महागाईचा दबाव आणखीनच वाढला. तसेच,  उष्णतेच्या लाटांमुळे पिकांचे नुकसान झाले आणि त्यामुळे भाज्यांच्या किंमती वाढल्या असे ते म्हणाले.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1845170) आगंतुक पटल : 237
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi