उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

देशांतर्गत पर्यटन आपल्या देशाच्या एकता आणि अखंडतेला अधिक बळकट करत असल्याचे प्रतिपादन करत जनतेने देशांतर्गत पर्यटनाला अधिक प्राधान्य देण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

Posted On: 26 JUL 2022 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जुलै 2022

 

उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी, देशांतर्गत पर्यटनाला अधिक प्राधान्य देण्याचे तसेच परदेशवारीचा निर्णय घेण्यापूर्वी देशाच्या सर्व भागांना भेट देऊन आधी तेथील पर्यटनाचा आनंद घेण्याचे आवाहन जनतेला केले. देशाच्या ईशान्य भागातील पर्यटनाला चालना देण्याच्या गरजेवर भर देत नायडू म्हणाले की, “लोकांदरम्यान सतत होणारे व्यवहार आणि संवाद आपल्या देशाची एकता आणि अखंडता यांना अधिक मजबूत करू शकतील.”

देशाच्या 18 राज्यांतील 5 महिलांसह एकूण 75 दुचाकीस्वारांनी ईशान्येकडील सर्व म्हणजे आठ राज्यांमध्ये प्रवास करण्यासाठी हाती घेतलेल्या “नॉर्थ इस्ट ऑन व्हील्स” या मोहिमेतील सहभागींशी संवाद साधताना ते आज बोलत होते.

प्रवासाची आवड असणाऱ्या लोकांनी ईशान्य भारताला भेट देऊन त्या प्रदेशातील निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यावा आणि आपल्या संस्कृतीमधील विविधतेचे कौतुक करावे असे त्यांनी सांगितले.

सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात देशाला मार्गदर्शन केल्याबद्दल ईशान्य भारतातील जनतेची प्रशंसा करून, ईशान्येकडील राज्यांमधील सर्वोत्तम पद्धती शिकण्याचा आणि क्रमाक्रमाने शाश्वत कृषी पद्धतीकडे वळण्याचा सल्ला उपराष्ट्रपतींनी इतर राज्यांना यावेळी दिला.
ईशान्य भारतातील राज्यांमधील पायाभूत सुविधांमध्ये विशेषतः दळणवळण सुविधामध्ये उल्लेखनीय सुधारणा झाल्याचा विशेष उल्लेख देखील उपराष्ट्रपतींनी यावेळी केला आणि ते म्हणाले की या प्रयत्नांमुळे “या भागातील विकासाचे नवे पर्व अवतरत” आहे.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1845030) अभ्यागत कक्ष : 208