संरक्षण मंत्रालय
शस्त्रास्त्र निर्मिती केंद्र
Posted On:
25 JUL 2022 6:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जुलै 2022
संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 358 खाजगी कंपन्यांना,उत्पादन केंद्र स्थापन करण्यासाठी 584 संरक्षण परवाने दिले आहेत.यात 107 परवाने हे शस्त्रांच्या निर्मितीसाठी आहेत. त्याचबरोबर संरक्षण क्षेत्रातल्या 16 सार्वजनिक कंपन्या या सैन्य दलासाठी विविध साधने आणि उत्पादने तयार करणाऱ्या आहेत.
ही माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी राज्यसभेमध्ये, जेबी माथर हिशम यांनी विचारलेल्या प्रश्नाला एका लेखी उत्तरात दिली आहे.
* * *
S.Kakade/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1844720)
Visitor Counter : 140