राष्ट्रपती कार्यालय
कार्यकाल समाप्तीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या करणार राष्ट्राला संबोधित
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2022 9:24PM by PIB Mumbai
आपल्या कार्यकाल समाप्तीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या, (24 जुलै 2022) राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत. आकाशवाणीच्या सर्व राष्ट्रीय वाहिन्यांवर आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून संध्याकाळी सात वाजल्यापासून या भाषणाचे आधी हिंदीत आणि त्यानंतर इंग्रजीतील प्रसारण केले जाणार आहे. हिंदी आणि इंग्रजी भाषणांच्या प्रक्षेपणानंतर दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांवरून प्रादेशिक भाषांमध्ये ते प्रक्षेपित होईल. तर आकाशवाणीवरून रात्री साडेनऊ वाजल्यापासून प्रादेशिक भाषांमधील अनुवाद संबंधित प्रादेशिक वाहिन्यांवरून प्रसारित केले जातील.
***
R.Aghor/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1844291)
आगंतुक पटल : 191