आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकत्रित कोविड-19 लसीकरणाने पार केला 201.68  कोटीचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील मुलांना दिल्या पहिल्या लसीच्या 3.84   कोटी हून अधिक मात्रा

भारताची सध्याची उपचाराधीन रुग्ण संख्या  1,50,100

गेल्या 24 तासांत 21,411 नवीन रूग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.46%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.46%

Posted On: 23 JUL 2022 9:45AM by PIB Mumbai

 

आज सकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताची कोविड-19 लसीकरणाची व्याप्ती 201.68  कोटीहून अधिक (2,01,68,14,771)  पर्यंत पोहचली आहे. 2,66,09,306  सत्रांच्या माध्यमातून हे यश साध्य झाले.

12  ते 14  वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च  2022 पासून कोविड-19 विरोधी लसीकरण सुरू झाले. आतापर्यंत, 3.84  कोटी (3,84,35,980) हून अधिक पौगंडावस्थेतील मुलामुलींना कोविड-19 विरोधी लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18 ते  59 वयोगटातील लोकांना  कोविड-19 खबरदारीचा डोस देण्यास 10 एप्रिल 2022 रोजी सुरूवात झाली.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार आलेला एकत्रित आकडेवारी खालीलप्रमाणे :

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10410857

2nd Dose

10083941

Precaution Dose

6139750

FLWs

1st Dose

18428851

2nd Dose

17659934

Precaution Dose

11761180

Age Group 12-14 years

1st Dose

38435980

2nd Dose

26953686

Age Group 15-18 years

1st Dose

60988770

2nd Dose

50542921

Age Group 18-44 years

1st Dose

559159870

2nd Dose

507171319

Precaution Dose

12438798

Age Group 45-59 years

1st Dose

203614293

2nd Dose

194866095

Precaution Dose

9034086

Over 60 years

1st Dose

127391804

2nd Dose

121767056

Precaution Dose

29965580

Precaution Dose

6,93,39,394

Total

2,01,68,14,771

 

भारतात सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 1,50,100 इतकी असून अशा रूग्णांची संख्या देशातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णांच्या 0.34% इतकी आहे.

परिणामी, भारताचा कोविडमधून रूग्ण  बरे होण्याचा दर 98.46% इतका आहे. गेल्या 24 तासांत 20,726  रूग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रूग्णांची एकत्रित संख्या (कोरोना महासाथ सुरू झाल्यापासून) सध्या 4,31,92,379 इतकी आहे.

गेल्या 24 तासांत,  21,411  नवीन रूग्णांची नोंद देशभरात झाली आहे.

गेल्या 24 तासांतएकूण 4,80,202  इतक्या कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या असून भारताने आतापर्यंत 87.21  कोटी (87,21,36,407)  इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्याच्या घडीला 4.46%  इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.46% असल्याची नोंद झाली आहे.

***

A.Chavan/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1844173) Visitor Counter : 135