कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मॉरिशसचे कृषी उद्योग आणि अन्न सुरक्षा मंत्री मनीष गोबीन यांनी केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांची भेट घेतली


भारत आणि मॉरिशस हे दोन्ही देश इतर देशांशी अन्न सुरक्षेच्या मुद्यावर अधिक सखोलपणे काम करतील

Posted On: 22 JUL 2022 9:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2022

 

मॉरिशसचे कृषी उद्योग आणि अन्न सुरक्षा मंत्री मनीष गोबीन यांनी आज नवी दिल्ली येथे  केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट घेतली. दोन्ही देश इतर देशांशी अन्न सुरक्षेच्या मुद्यावर अधिक सखोलपणे काम करावे यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.

या बैठकीत, केंद्रीय मंत्री तोमर म्हणाले की, भारताचे मॉरिशस सोबतचे संबंध अत्यंत दृढ आहेत आणि हे संबंध केवळ राजकीय आणि व्यापारी संबंध नाहीत तर सांस्कृतिक आणि अध्यात्मिक देखील आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार अत्यंत गंभीरपणे कार्य करत असून देशाला या क्षेत्रात पुढे नेण्यासाठी अनेक मजबूत पावले उचलण्यात आली आहेत असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, भारताने आता केवळ देशांतर्गतच गरजा पूर्ण करण्यासाठीच नव्हे तर इतर देशांना धान्य निर्यात करण्यासाठी देखील अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भरता प्राप्त केली आहे.

मॉरिशस चे मंत्री गोबीन म्हणाले की, त्यांचे भारताशी कौटुंबिक संबंध आहेत आणि मॉरिशसमधील 60% लोक भारतीय वंशाचे आहेत. पंतप्रधानांनी सौरउर्जेच्या संदर्भात सुरु केलेल्या आघाडीसारखीच अन्न सुरक्षेच्या मुद्यावर देखील आघाडी करण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली.  आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन मंडळाच्या कार्याची प्रशंसा करून त्यांनी मंडळाशी करार करण्याची इच्छा व्यक्त केली.भारतीय कृषी क्षेत्राच्या विकासात आयसीएआरची भूमिका सविस्तरपणे मांडत, केंद्रीय मंत्री तोमर यांनी मंडळाशी संलग्न कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विद्यापीठे आणि 100 हून अधिक इतर संस्थांच्या भूमिकेचा देखील उल्लेख केला. गोबीन यांच्याकडे सामंजस्य कराराचा आराखडा निश्चित करावा जेणेकरून त्यावर चर्चा होऊ शकेल अशी विनंती तोमर यांनी यावेळी केली.

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1844055) Visitor Counter : 178


Read this release in: English , Urdu , Hindi