संरक्षण मंत्रालय
राष्ट्रीय छात्र सेनेचा (NCC) विस्तार
Posted On:
22 JUL 2022 9:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जुलै 2022
सरकारने सीमावर्ती भागातील तालुके, सागरी किनारपट्टीवरील तालुके आणि वायुदलाची केंद्र असलेल्या तालुक्यांमध्ये 1 लाख रिक्त पदे उपलब्ध करून राष्ट्रीय छात्र सेनेचा (NCC) विस्तार सुरु केला आहे. यामध्ये सीमावर्ती भागातील 92 तालुक्यांचा समावेश आहे.
तपशील पुढील प्रमाणे:
Name of District
|
Name of Taluk
|
Vishakhapatnam
|
Bheemunipatnam, Visakhapatnam, Gajuwaka
|
Anakapalli
|
Atchuthapuram
|
Sri Potti Sriramulu Nellore
|
Allur, Kavali, Indukurpet, Venkatachalam, Muthukuru, Kaluvoya, Atmakur, Vidavalur, Sri Potti Sriramulu Nellore
|
Prakasam
|
Yerragondapalem
|
NCC कॅडेट्सना पुरवण्यात आलेल्या प्रोत्साहनपर सुविधांचे (शैक्षणिक संस्था आणि रोजगार) तपशील खाली दिले आहेत:
शैक्षणिक संस्थांमधील प्रोत्साहनपर सुविधा, यासह अन्य बाबी:
राज्य सरकारांनी NCC च्या ‘A’, ‘B’ आणि ‘C’ प्रमाणपत्र धारकांना उच्च शिक्षण संस्थांमध्ये (a) जागांची टक्केवारी आरक्षित करून आणि (b) ग्रेस/बोनस गुणांना महत्व देऊन प्रवेश देण्यासाठी प्रोत्साहन अधिसूचित केले आहे.
रोजगाराच्या संधी मध्ये प्रोत्साहन:
1.सशस्त्र सेना : NCC ‘C’ प्रमाणपत्र धारकांसाठी प्रत्येक सेवेद्वारे अधिकारी संवर्गात रिक्त पदे पुढील प्रमाणे राखीव ठेवण्यात आली आहेत:
S No
|
Training Establishments
|
Total Vacancies per course *
|
(a)
|
Officer Training Academy, Chennai
|
SD+SW - 50+4
|
(b)
|
Indian Military Academy
|
SD – 25
|
(c)
|
Air Force Academy
|
10% of course vacancies
|
(d)
|
Naval Academy
|
SD - 06
|
* वर्षाला दोन अभ्यासक्रम घेतले जातात
SD – वरिष्ठ विभाग (मुले)
SW – वरिष्ठ विंग (मुली)
सशस्त्र दलांच्या इतर श्रेणी : सशस्त्र दलाच्या अन्य श्रेणीसाठी अर्ज भरताना NCC ‘A’, ‘B’ आणि ‘C’ प्रमाणपत्र धारकांना बोनस गुण देण्यात आले आहेत.
गृह मंत्रालय: भारत सरकार, गृह मंत्रालयाने NCC ‘A’, ‘B’ आणि ‘C’ प्रमाणपत्र धारकांना उप-निरीक्षक(सामान्य कर्तव्य) आणि हवालदार(सामान्य कर्तव्य), केंद्रीय सशस्त्र पोलीस दल(CAPFs) या पदांच्या भरती परीक्षेत पुढील प्रोत्साहन/बोनस गुण दिले आहेत:
- NCC ‘C’ प्रमाणपत्र – कमाल गुणांच्या 5%.
- NCC ‘B’ प्रमाणपत्र – कमाल गुणांच्या 3%.
- NCC ‘A’ प्रमाणपत्र – कमाल गुणांच्या 2%.
बंदरे, जहाज बांधणी आणि जल मार्ग मंत्रालय: भारत सरकार, बंदरे मंत्रालय, जहाज बांधणी आणि जल मार्ग मंत्रालयाने देखील भारतीय सागरी विद्यापीठाच्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पुढील प्रोत्साहनपर सुविधा दिल्या आहेत:
- NCC ‘C’ प्रमाणपत्र – कमाल गुणांच्या 5%.
- NCC ‘B’ प्रमाणपत्र – कमाल गुणांच्या 3%.
- NCC ‘A’ प्रमाणपत्र – कमाल गुणांच्या 2%.
ही माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज लोकसभेत बालाशोवरी वल्लभानेनी आणि मागुंता श्रीनिवासुलू यांना लेखी उत्तरामधून दिली.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1844053)