वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी व्हाईट गुड्स अर्थात मोठ्या आकाराच्या घरगुती विद्युत उपकरणांच्या निर्मिती उद्योगांना जागतिक पातळीवरील आघाडीचे उद्योग होण्याचे केले आवाहन; कामगिरीशी-संलग्न अनुदान योजना त्या दिशेने सुरुवातीची चालना देण्याच्या उद्देशाने सुरु केलेली योजना आहे
Posted On:
22 JUL 2022 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जुलै 2022
व्हाईट गुड्स अर्थात रेफ्रीजरेटर, वॉशिंग मशीन सारख्या मोठ्या आकाराच्या घरगुती विद्युत उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रातील पीएलआय अर्थात कामगिरीशी-संलग्न अनुदान योजना ही भारत, भारतातील उद्योग आणि नागरिक यांच्यासाठी वरदान ठरली आहे. व्हाईट गुड्स या विषयावर उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि उद्योग संघटना फिक्की यांनी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या उच्च स्तरीय गुंतवणूकदार गोलमेज परिषदेत बोलताना, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की पीएलआय योजनेचा वापर उद्योगांना जागतिक बाजारात स्पर्धा करण्यासाठी पहिली काही पावले उचलण्यास उपयुक्त ठरणारी आणि सुरुवातीची चालना देणारी आहे. अनुदान काढून टाकून एलईडी क्रांती कशा प्रकारे आणली त्याचे उदाहरण देत ते म्हणाले, “कोणताही देश दीर्घ काळात सरकारी पाठिंब्याच्या भरवशावर समृध्द होऊ शकत नाही.”
एसी आणि एलईडी क्षेत्राकडून मुक्त व्यापार करारामध्ये प्रवेश देण्याबाबत आलेल्या मागणीबद्दल आनंद व्यक्त करत केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की, या उद्योगांनी आता जागतिक दर्जाच्या उद्योगांशी स्पर्धा करण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. “तुम्हांला जागतिक पातळीवर प्रस्थापित व्हायचे आहे. तुम्हांला सामर्थ्याच्या भूमिकेतून बरोबरीला येऊन बाकीच्या जगाशी स्पर्धा करायची आहे. भारत हे दुबळे राष्ट्र नाही.आपण कोणत्याही स्पर्धेला घाबरत नाही. आपण हा संदेश जगाला दिला पाहिजे. व्हाईट गुड्स उत्पादनांमध्ये पीएलआय योजनेच्या यशाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. 61 कंपन्यांनी देशभरात 14 राज्यांमध्ये 111 ठिकाणी सुट्या भागांच्या निर्मितीचे प्रकल्प उभारले आहेत आणि रोजगार निर्मिती करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1844031)