निती आयोग
azadi ka amrit mahotsav

कॉप 26 चे अध्यक्ष आणि नीती आयोग यांनी इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी आणि बॅटरीचा पुनर्वापर तसेच पुनर्वापराच्या बाजारपेठेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचा केला प्रारंभ

Posted On: 21 JUL 2022 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जुलै 2022


कॉप 26 चे अध्यक्ष आलोक शर्मा यांच्या 21 आणि 22 जुलै 2022 च्या भारत भेटीदरम्यान, नीती आयोगाने आज दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा प्रारंभ केला, त्यामध्ये E-AMRIT (भारताच्या वाहतुकीला गतिमान ठरणारी ई-मोबिलिटी क्रांती), इलेक्ट्रिक मोबिलिटीबाबत जागरूकता निर्माण करण्यारे मोबाईल ऍप्लिकेशन आणि भारतातील प्रगत रसायनशास्त्र सेल बॅटरी पुनर्वापर आणि पुनर्वापर बाजाराविषयी अहवाल यांचा समावेश आहे. या उपक्रमांचा प्रारंभ कॉप 26 चे अध्यक्ष आलोक शर्मा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि नीती  आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांनी केला.  

 कॉप 26 हवामान शिखर परिषदेत प्रारंभ झालेल्या, इंग्लंडच्या ग्लासगो ब्रेक थ्रू ला पाठिंबा देणाऱ्या आणि त्यावर स्वाक्षरी करणाऱ्या ४२ नेत्यांमध्ये भारताचाही समावेश आहे. इंग्लंडच्या आणि अमेरिकेसोबत भारत हा ग्लासगो ब्रेक थ्रू रस्ते परिवहनचा सह-संयोजक आहे. शून्य कार्बन उत्सर्जन करणारी तसेच सर्व क्षेत्रांमध्ये परवडणारी, सहज उपलब्ध , टिकाऊ 2 आणि 3-चाकी वाहने, कार, व्हॅन आणि हेवी-ड्युटी वाहनांची निर्मिती करून 2030 पर्यंत नव सामान्य बनवणे हे रस्ते परिवहनावरील ब्रेकथ्रूचे उद्दिष्ट आहे.

या कार्बन विरहित पायाभूत सुविधांना बळ देण्यासाठी, नीती आयोग इंग्लंडच्या सरकारसोबत ई-वाहने, चार्जिंग पायाभूत सुविधा आणि बॅटरी स्टोरेज या क्षेत्रांमध्ये सहयोग करत आहे. या कार्यक्रमात बोलताना, कॉप 26 च्या अध्यक्षांनी अधोरेखित केले की “भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाचा आणि सर्वात वेगाने वाढणारी वाहन बाजारपेठ आहे, ज्यामधे इलेक्ट्रिक वाहने वापराची प्रचंड क्षमता आहे. शून्य कार्बन उत्सर्जन करणारी वाहने (ZEVs) तंत्रज्ञानावरील खर्च कमी करत आहेत, आपण श्वास घेत असलेली हवा स्वच्छ आहे याची खात्री करत आहेत आणि आयातित इंधनावरील आपला अवलंबित्व कमी करत आहे. त्यामुळे याकडे लोकांचा कल वेगाने वाढवत असून 100,000 नवीन ई-मोबिलिटी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.

इलेक्ट्रिक मोबिलिटीवर इंग्लंडच्या - नीती  आयोगाचा सहयोगी उपक्रम सुरू करताना, आलोक शर्मा म्हणाले, "हे उपक्रम केवळ इलेक्ट्रिक वाहनांच्या पायाभूत सुविधांवरच नव्हे, तर संपूर्णपणे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कृती करण्यावर यूके-भारत सहकार्याचे शाश्वत मूल्य प्रदर्शित करतात. भविष्यात या क्षेत्रातील आमची भागीदारी अशीच सुरू राहिल , असा मला विश्वास आहे.

e-AMRIT ॲप वापरकर्त्यांना एंगेजमेंट टूल्स सारखी महत्त्वाची माहिती देते ज्यामुळे त्यांना इलेक्ट्रिक वाहनांच्या फायद्यांचे मूल्यांकन करण्यासाठी, बचत निर्धारित करण्यासाठी आणि भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजार आणि उद्योगातील घडामोडींची सर्व माहिती त्यांच्या सहज उपलब्ध होण्यासाठी सक्षम करते. आजपासून अँड्रॉइड आवृत्तीमध्ये गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध होणारे मोबाईल ॲप ई-अमृतचा भाग आहे. (www.e-amrit.niti.gov.in)

हे ॲप या लिंकवर उपलब्ध आहे.  https://play.google.com/store/apps/details?id=com.eamrit


* * *

R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1843626) Visitor Counter : 275


Read this release in: English , Urdu , Hindi