PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 21 JUL 2022 7:10PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 200.91 cr Total Vaccine doses (92.77 cr Second Dose and 6.34 cr Precaution Dose) have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 29,12,855 doses administered in last 24 hours
  • India's Active caseload currently stands at 1,48,881
  • Active cases stand at 0.34%
  • Recovery Rate currently at 98.46%
  • 18,294 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to
  • 4,31,50,434
  • 21,566 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (4.25%)
  • Weekly Positivity Rate (4.51%)
  • 87.11 cr Total Tests conducted so far; 5,07,360 tests conducted in the last 24 hours

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 21 जुलै 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

आज सकाळी सात वाजता आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, देशातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 200.91 कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 2,64,98,391 सत्रांच्या माध्यमातून हे साध्य करण्यात आले आहे. 12 ते 14 वयोगटातील किशोरांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम 16 मार्च 2022 रोजी सुरू करण्यात आली. आतापर्यंत  3.82 हून (3,82,20,319) अधिक किशोरांना पहिल्या डोसच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, 18 ते 59 वयोगटातील लोकांना कोविड-19 खबरदारीची लसीची मात्रा देण्याची मोहीम 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाली.

भारतातील एकूण उपचाराधीन रूग्णसंख्या सध्याच्या घडीला 1,48,881 आहे. उपचाराधीन रूग्ण संख्येची टक्केवारी देशाच्या एकूण पॉझिटिव्ह रूग्णांच्या तुलनेत 0.34 टक्के इतकी आहे. परिणामी, भारताचा कोरोनामुक्तीचा दर सध्याच्या घडीला 98.46 टक्के  इतका आहे. गेल्या 24  तासांत, 18,294 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची (कोरोना महासाथ सुरू झाल्यापासून) आता 4,31,50,434 इतकी आहे.

गेल्या 24  तासांत, 21,566 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत, एकूण 5,07,360 एकूण चाचण्या पार पाडल्या आहेत. आतापर्यंत, भारताने एकूण 87.11 (87,11,60,846) कोटी हून अधिक चाचण्या घेतल्या आहेत. देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्याच्या घडीला 4.50 टक्के इतका असून दैनंदिन सध्याच्या घडीला 4.25 टक्के इतका आहे.

 

इतर अपडेट्स :

  • राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे कोविड प्रतिबंधक लसीच्या न वापरलेल्या 8.32 कोटींहून मात्रा लसीकरणासाठी उपलब्ध आहेत.

 

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

 

* * *

N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1843578) Visitor Counter : 172