ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाचा नेट झिरो हरितगृह वायू उत्सर्जनासाठीचा पथदर्शी आराखडा विकसित करण्यासाठी राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाने नीती आयोगासमवेत इरादापत्रावर केली स्वाक्षरी

Posted On: 21 JUL 2022 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जुलै 2022

 

राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाने नेट झिरो हरितगृह  वायू उत्सर्जनासाठीचा पथदर्शी आराखडा विकसित करण्यासाठी काल नीती आयोगासमवेत  इरादापत्रावर स्वाक्षरी केली. देशाचे उर्जा क्षेत्र हरित क्षेत्र म्हणून उदयाला आणण्यासाठी या निवेदनात दोन्ही संस्थांमधील सहकार्यावर भर देण्यात आला आहे. त्यायोगे  वीज निर्मितीसाठी  वापरल्या जाणार्‍या विविध इंधनांच्या  मिश्रणात वैविध्य आणण्यासाठी राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाचे  धोरण आखणे  आणि परिणामी  कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण   कमी करत 2070 पर्यंत नेट झिरो  कार्बन उत्सर्जन  गाठण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देणे, हा या मागील उद्देश आहे.

कॉप 26 परिषदेत भारत सरकारने घोषित केल्याप्रमाणे ‘पंचामृत’ उद्दिष्ट गाठण्यासाठी नीती आयोग वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वातावरणात 2070 पर्यंत नेट झिरो हरितगृह  वायू उत्सर्जन  साध्य  करण्यासाठी कार्य करत आहे.

देशाच्या स्थापित निर्मिती क्षमतेच्या 17% क्षमतेसह, राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळ,  देशाच्या उर्जेच्या एकूण आवश्यकतेच्या सुमारे 24% इतक्या उर्जेची पूर्तता करते.

या सहयोगामुळे राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळ, नीती आयोगाच्या उर्जा तंत्रज्ञांचे खालील बाबतीत सहकार्य घेऊ शकेल

  • देशाच्या पंचामृत उद्दिष्टांशी एकरूप असलेल्या नेट झिरो हरितगृह  वायू उत्सर्जनासाठीचा पथदर्शी आराखडा विकसित करणे
  • उत्सर्जन आणि ऊर्जा (पोर्टफोलिओ मिक्स) उदाहरण ज्यामध्ये  2030, 2037, 2047 आणि 2070 साठी अनुकूल परिस्थिती विकसित करणे
  • राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळात  कार्बन व्यवस्थापन युनिटच्या स्थापनेसाठी कार्बन उत्सर्जन  कमी करण्यासाठीच्या सर्व उपक्रमांना एका छत्राखाली आणण्यासाठी सहकार्य

 
* * *

N.Chitale/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1843557) Visitor Counter : 467


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi