ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये शिधापत्रिकांचे डीजीटायझेशन झाले पूर्ण; जवळजवळ 19.5 कोटी शिधापत्रिका डिजिटल करण्यात आल्या

Posted On: 20 JUL 2022 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जुलै 2022

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्य मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरामधून सांगितले की सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये शिधापत्रिकांच्या डीजीटायझेशनचे काम पूर्ण झाले असून 19.5 कोटी (अंदाजे) शिधापत्रिका संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या पारदर्शकता पोर्टलवर उपलब्ध आहेत.

शिधापत्रिकेच्या आधार क्रमांकाबरोबर जोडणीची राज्य/केंद्रशासित प्रदेशवार प्रगती दर्शवणारे निवेदन यामध्ये  जोडण्यात आले आहे.

एनएफएसए अंतर्गत एकूण 19.5 कोटी शिधापत्रिकांपैकी 99% शिधापत्रिका आधार क्रमांकाबरोबर जोडण्यात आल्या आहेत (म्हणजेच कुटुंबातील किमान एक सदस्य). राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना उर्वरित शिधापत्रिकांची आधार क्रमांकाबरोबर जोडणी पूर्ण करण्यासाठी 30 सप्टेंबर, 2022 पर्यंत वेळ देण्यात आला आहे.

सार्वजनिक वितरण प्रणालीची (PDS) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने एक योजना अमलात आणली आहे – लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणालीचे (TPDS) संपूर्ण संगणकीकरण. या अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

Annexure

 

A statement showing State/UT-wise progress of Aadhaar seeding in ration card

 

Sl.

States/UTs

% Seeding of Ration Cards

1

Andaman and Nicobar Islands

100%

2

Andhra Pradesh

100%

3

Arunachal Pradesh

85%

4

Assam

93%

5

Bihar

100%

6

Chandigarh

100%

7

Chhattisgarh

100%

8

Dadra & NH and Daman Diu

100%

9

Delhi

100%

10

Goa

100%

11

Gujarat

100%

12

Haryana

100%

13

Himachal Pradesh

100%

14

Jammu & Kashmir

100%

15

Jharkhand

98%

16

Karnataka

100%

17

Kerala

100%

18

Ladakh

99%

19

Lakshadweep

100%

20

Madhya Pradesh

100%

21

Maharashtra

100%

22

Manipur

99%

23

Meghalaya

38%

24

Mizoram

98%

25

Nagaland

92%

26

Odisha

99%

27

Puducherry

97.4%

28

Punjab

100%

29

Rajasthan

100%

30

Sikkim

100%

31

Tamil Nadu

100%

32

Telangana

100%

33

Tripura

100%

34

Uttarakhand

100%

35

Uttar Pradesh

100%

36

West Bengal

95%

 

National Summary

99.1%

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1843247) Visitor Counter : 153