जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केन - बेतवा जोड प्रकल्पाच्या सुकाणू समितीची दुसरी बैठक

प्रविष्टि तिथि: 20 JUL 2022 8:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जुलै 2022

 

केन - बेतवा जोड प्रकल्पाच्या सुकाणू समितीची दुसरी बैठक आज विज्ञान भवन, नवी दिल्ली इथं संपन्न झाली. जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग, जल शक्ती मंत्रालयाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. बैठकीला मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांचे प्रतिनिधी आणि नीती आयोग आणि विविध केंद्रीय मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जलस्त्रोत, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग जल शक्ती मंत्रालयाचे सचिव म्हणाले केन - बेतवा जोड प्रकल्प, जो बुंदेलखंड विभागाच्या जल सुरक्षेसाठी आणि सामाजिक - आर्थिक विकासासाठी महत्वाचा आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून कालबद्ध रीतीने राबविला गेला पाहिजे. यात बाधित लोकांचे पुनर्वसन आणि पुनर्वसन, या भागाचे संरक्षण विशेषतः या भागावर अवलंबून असलेल्या पन्ना व्याघ्र प्रकल्पातील प्रजातींचे संरक्षण करावे.

तांत्रिक आणि नियोजनाशी संबंधित विविध मुद्द्यांची समीक्षा करण्यास आणि प्राधिकरणाला सल्ले देण्यास केन - बेतवा जोड प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लागार गटाची स्थापना करण्याचा प्रस्तावही या बैठकीत देण्यात आला.

N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1843244) आगंतुक पटल : 187
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi