आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        केंद्र सरकारने भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बंदरे येथे देशात प्रवेश करण्याच्या ठिकाणी करण्यात येत असलेल्या आरोग्यविषयक तपासणीचा घेतला आढावा
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                18 JUL 2022 9:35PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 18 जुलै 2022
 
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या विमानतळ आणि बंदरे या ठिकाणी होणाऱ्या  आरोग्यविषयक तपासणीचा आढावा घेतला.
विमानतळे आणि बंदरे या ठिकाणी नेमण्यात आलेले आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या प्रादेशिक कार्यालयांचे विभागीय संचालक या आढावा बैठकीला उपस्थित होते. देशात प्रवेश करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक आरोग्य तपासणी केली जाईल हे सुनिश्चित करण्याचे आदेश या सर्वांना देण्यात आले आहेत ज्यामुळे या  प्रवाश्यांद्वारे भारतात मंकीपॉक्स या आजाराचा प्रसार होण्याचा धोका कमी राहील.
आढावा बैठकीला आज उपस्थित असलेल्या सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या ‘मंकीपॉक्स आजाराच्या व्यवस्थापनासाठीच्या मार्गदर्शक तत्वां’नुसार या आजारासंबंधी वैद्यकीय सादरीकरण करून पुन्हा या आजाराची माहिती देण्यात आली आणि संबंधित बाबींविषयी सल्ला देण्यात आला.  
आंतरराष्ट्रीय बंदरे आणि विमानतळ येथे केलेल्या आरोग्य तपासणीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी कोणी बाधित रुग्ण आढळल्यास त्यांची माहिती वेळेवर आरोग्य विभागाला संदर्भित करून त्यांच्या अलगीकरणाची व्यवस्था व्हावी म्हणून प्रत्येक बंदर आणि विमानतळ यांच्याशी रुग्णालय सुविधांची योग्य जोडणी असेल याची सुनिश्चिती करून घेण्यात आली असून या आजाराशी संबंधित तपासणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी आंतरराष्ट्रीय बंदरे आणि विमानतळ या ठिकाणी असलेल्या इमिग्रेशनसारख्या इतर सर्व भागधारक विभागांशी समन्वय साधण्याचा सल्ला उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आला.
आंतरराष्ट्रीय आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील या आढावा बैठकीला उपस्थित होते.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:  @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1842516)
                Visitor Counter : 211