केंद्रीय लोकसेवा आयोग
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राज शुक्ला यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची घेतली शपथ
Posted On:
18 JUL 2022 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जुलै 2022
लेफ्टनंट जनरल ( निवृत्त )राज शुक्ला यांनी आज दुपारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य इमारतीतील सेंट्रल हॉलमध्ये केंद्रीय सेवा आयोगाचे सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
भारतीय लष्करात चार दशकांहून अधिक काळ कारकीर्द असलेल्या ,जनरल शुक्ला यांनी या क्षेत्रात व्यापक सेवा केली आहे - काउंटर इन्सर्जन्सी परिचालनामध्ये इन्फंट्री ब्रिगेड, काश्मीर खोर्यातील नियंत्रण रेषेवर बारामुल्ला विभाग आणि पश्चिम सीमेवर पिव्होट कॉर्प्सचे नेतृत्व केले.
डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज- वेलिंग्टन,संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालय- सिकंदराबाद आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय - नवी दिल्लीचे माजी विद्यार्थी, जनरल ऑफिसर यांनी लष्करी परिचालन संचालनालयामध्ये दोन वेळा कार्यकाळ भूषवलाआहे.
एक व्यावसायिक वैमानिक आणि प्रभावशाली वक्ता, जनरल शुक्ला यांना धोरणात्मक लष्करी घडामोडींमध्ये कायम स्वारस्य आहे. त्यांनी जवळपास 70 लेख/प्रकाशने लिहिली आहेत तसेच भारतात आणि परदेशात 180 हून अधिक चर्चासत्रे /परिसंवादामधील व्याख्यानांमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे.
त्यांच्या असाधारण सेवेची दखल घेऊन, 2021 च्या प्रजासत्ताकदिनी त्यांना 'परम विशिष्ट सेवा पदक' प्रदान करण्यात आले.
* * *
N.Chitale/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1842515)
Visitor Counter : 172