उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राज्यपालांनी राज्याचे मार्गदर्शक म्हणून काम करत राहण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

Posted On: 17 JUL 2022 10:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जुलै 2022 

 

राज्यपालांनी  राज्यांसाठी ‘मार्गदर्शक’ म्हणून काम करत राहण्याचे आणि भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध करून दिलेले कार्यक्रम राज्यांकडून योग्यरित्या राबवले जातील याची काळजी घेण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी केले  आहे. राज्यपालांचे  कार्यालय  हे "शोभेचे  पदही नाही आणि राजकीय पदही  नाही" आणि त्यांचे आचरण राज्य प्रशासनासाठी 'आदर्श ' ठरले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

उपराष्ट्रपतींनी आज उपराष्ट्रपती निवास येथे  स्नेहभोजन आयोजित केले होते. यावेळी  विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील राज्यपाल, नायब राज्यपाल आणि प्रशासक त्यांच्या जोडीदारासह उपस्थित होते.  

नायडू यांनी राज्यपालांना कुलपती या नात्याने त्यांच्या राज्यातील अधिकाधिक  विद्यापीठांना वारंवार भेटी देण्याचे  आणि  विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधण्याचे आवाहन केले. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याविषयीही सुचवले. 

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये क्षयरोग निर्मूलन आणि इतर आरोग्य जागृती उपक्रमांमध्ये राज्यपाल महत्त्वाचे भागीदार होऊ शकतात, असेही उपराष्ट्रपतींनी सुचवले. लसीकरणाचे उदाहरण देताना,  लोकांना लसीकरणासाठी प्रेरित केल्याचे  सकारात्मक परिणाम आणि भारतातील मृत्यूचे कमी झालेले प्रमाण याकडे नायडू यांनी लक्ष वेधले.  राज्यपालांनी विविध लसीकरण मोहिमांमध्ये भागीदार व्हावे आणि लोकांशी संवाद साधताना निरोगी आहाराच्या सवयींच्या महत्त्वावर भर द्यावा,असेही त्यांनी राज्यपालांना सुचवले. 

गृहमंत्री अमित शहा, वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

* * *

N.Chitale/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1842242) Visitor Counter : 197


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi