ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
व्यापार सुलभता आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगांवरील अनुपालान भार कमी करण्यासाठी केंद्रसरकारने कायदेशीर मापनपद्धती (वेष्टनामधील/ पॅकेज केलेल्या वस्तू) नियम 2011 मध्ये केली सुधारणा
या सुधारणेमुळे उद्योगांना QR कोड द्वारे डिजिटल स्वरुपात माहिती घोषित करता येणार
प्रविष्टि तिथि:
16 JUL 2022 3:40PM by PIB Mumbai
ग्राहक व्यवहार विभागाने कायदेशीर मापनपद्धती (वेष्टनामधील/ पॅकेज केलेल्या वस्तू), (दुसरी सुधारणा) नियम 2022 द्वारे इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर एखादी अनिवार्य घोषणा दिली नसेल तर ती QR कोड द्वारे घोषित करण्याची परवानगी एक वर्षाच्या काळासाठी दिली आहे.
या सुधारणेमुळे उद्योगांना उत्पादनाबाबतची सविस्तर माहिती QR कोडच्या माध्यमातून डिजिटल स्वरुपात घोषित करता येईल. यामुळे महत्त्वाच्या घोषणा उत्पादनावरील लेबलवर प्रभावीपणे घोषित करता येतील तर अन्य विस्तृत माहिती QR कोडच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत पोहोचवता येईल.
विभाग या डिजिटल युगात अनिवार्य घोषणा QR कोड द्वारे घोषित करून तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त वापर करण्यासाठी ग्राहकांना सक्षम करेल, ज्यामध्ये टेलीफोन क्रमांक आणि ई-मेल वगळता उत्पादक, पॅकर अथवा आयातदाराचा पत्ता,वस्तूचे सर्वसामान्य जेनेरिक नाव, वस्तूचे माप आणि मिती असे ग्राहकविषयक तपशील स्कॅन करता येतील.
यापूर्वी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह सर्व प्रीपॅकेज उत्पादनांना पॅकेजवर कायदेशीर मापनपद्धती (वेष्टनामधील/ पॅकेज केलेल्या वस्तू), नियम 2011 अंतर्गत सर्व अनिवार्य घोषणा घोषित करणे बंधनकारक आहे.
***
S.Kakade/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1842061)
आगंतुक पटल : 275