आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 199.71 कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील सुमारे 3.79 कोटी किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,40,760

गेल्या 24 तासात 20,044 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.48%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.40%

Posted On: 16 JUL 2022 11:08AM by PIB Mumbai

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 199.71(1,99,71,61,438) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,62,86,177 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.79 (3,79,06,419) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,10,235

2nd Dose

1,00,78,887

Precaution Dose

59,98,970

FLWs

1st Dose

1,84,27,251

2nd Dose

1,76,50,740

Precaution Dose

1,14,03,738

Age Group 12-14 years

1st Dose

3,79,06,419

2nd Dose

2,60,53,347

Age Group 15-18 years

1st Dose

6,08,19,753

2nd Dose

5,00,42,100

Age Group 18-44 years

1st Dose

55,88,45,434

2nd Dose

50,56,35,952

Precaution Dose

52,49,138

Age Group 45-59 years

1st Dose

20,35,60,888

2nd Dose

19,45,03,378

Precaution Dose

38,26,893

Over 60 years

1st Dose

12,73,54,636

2nd Dose

12,15,36,569

Precaution Dose

2,78,57,110

Precaution Dose

5,43,35,849

Total

1,99,71,61,438

 

भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,40,760 इतकी आहे, ही संख्या देशाच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.32% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.48% आहे. गेल्या 24 तासात 18,301 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे, आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) 4,30,63,651 झाली आहे.

गेल्या 24 तासात 20,044 नव्या रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,17,895 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 86.90 (86,90,33,063) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.40% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.80% आहे.

***

Jaydevi PS/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1841969) Visitor Counter : 204