शिक्षण मंत्रालय

उच्च शैक्षणिक संस्थांची भारत क्रमवारी - 2022 केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी केली जाहीर

Posted On: 15 JUL 2022 10:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जुलै 2022

 

केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत उच्च शैक्षणिक संस्थांची भारत क्रमवारी - 2022 जाहीर केली. आपल्या उच्च शैक्षणिक संस्था आपल्या  शिक्षण व्यवस्थेला अधिक चैतन्यशील बनवण्यासाठी आणि आपल्या तरुणांना भविष्यासाठी सज्ज करण्याच्या दिशेने कार्यरत आहेत, असे प्रधान यांनी सांगितले. मूल्यमापन, मान्यता आणि क्रमवारीसाठी एक बळकट आणि वस्तुनिष्ठ आराखडा उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये गुणवत्ता वाढविण्यासाठी मोठी भूमिका बजावेल, असेही ते म्हणाले.

क्रमवारीच्या मापदंडाच्या पाच विस्तृत श्रेणी आणि गुण

राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा (एनआयआरिफ ), नोव्हेंबर 2015 मध्ये शिक्षण मंत्रालयाने जारी केला, या आवृत्तीसह 2016 ते 2022 या वर्षांसाठी प्रसिद्ध झालेल्या भारत क्रमवारीच्या मागील सहा आवृत्त्यांसाठी या आराखड्याचा उपयोग करण्यात आला. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यामध्ये निश्चित केलेल्या मापदंडांच्या पाच विस्तृत श्रेणी आणि 10 च्या प्रमाणात त्यांचे गुण खाली दिले आहे:

अध्यापन, शिक्षण आणि स्त्रोत

संशोधन आणि व्यावसायिक अध्ययन

पदवी परीक्षांचे निकाल

जनसंपर्क आणि सर्वसमावेशकता

आकलनशक्ती

2016 ते 2022 या कालावधीत भारताच्या क्रमवारीतील संस्थांच्या संख्येत वाढ

एकूण 100 संस्थांना क्रमवारीत स्थान देण्यात आले आहे.विद्यापीठे आणि महाविद्यालये , अभियांत्रिकी श्रेणीमधील क्रमवारीत असलेल्या संस्थांची संख्या 2019 पासून 200 पर्यंत वाढवण्यात आली आहे.शिवाय, या वर्षापासून व्यवस्थापन आणि फार्मसीमध्ये क्रमवारीत असलेल्या संस्थांची संख्या प्रत्येकी 75 ते 100 पर्यंत वाढवण्यात येत आहे. तसेच स्थापत्यशास्त्र, कायदा, वैद्यकीय, दंत तसेच संशोधन संस्था या विषयांच्या संस्थांमध्ये  क्रमवारीत आलेल्या  संस्थांची संख्या 30 ते 50 च्या दरम्यान मर्यादित आहे.एकूण, विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या संदर्भात 101-150 आणि 151-200, अभियांत्रिकीच्या संदर्भात  201-250 आणि 251-300 आणि फार्मसी आणि व्यवस्थापनाच्या बाबतीत 101-125 च्या क्रमवारी गटात  अतिरिक्त क्रमवारी योग्यरित्या एकत्रित केली जाते.

भारतीय मानांकन 2022 ची ठळक वैशिष्ट्ये

1. भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रासने समग्र संस्थांच्या यादीत सलग चौथ्या वर्षी तर अभियांत्रिकी संस्थांच्या यादीत सलग सातव्या वर्षी आपले प्रथम स्थान कायम राखले आहे.

2. समग्र श्रेणीतील सर्वोच्च 100 मध्ये 40 सीएफटीआय आणि सीएफयू (38 तांत्रिक संस्थांसह), 26 राज्य विद्यापीठे, 24 अभिमत विद्यापीठे, 6 खाजगी विद्यापीठे, 7 वैद्यकीय संस्था आणि 3 व्यवस्थापन संस्था आहेत.

3. भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू सलग सातव्या वर्षी विद्यापीठांच्या श्रेणीत अव्वल स्थानावर आहे. या संस्थेने सलग दुस-या वर्षी संशोधन संस्था श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

4. आय आय एम अहमदाबादने व्यवस्थापन विषयात अव्वल स्थान मिळवून सलग तिसऱ्या वर्षी पहिले स्थान कायम राखले आहे.

5. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), नवी दिल्लीने सलग पाचव्या वर्षी वैद्यकीय क्षेत्रात अव्वल स्थान पटकावले आहे. शिवाय, AIIMS प्रथमच समग्र श्रेणीमध्ये 9 व्या स्थानावर पोहोचले आहे.

6. जामिया हमदर्द औषध निर्माण संस्थांच्या यादीत सलग चौथ्या वर्षी अव्वल स्थानावर आहे.

7. मिरांडा हाऊसने सलग सहाव्या वर्षी महाविद्यालयांमध्ये पहिले स्थान कायम राखले आहे.

8. भारतीय तंत्रज्ञान संस्था, रुरकी सलग दुसऱ्या वर्षी आर्किटेक्चर विषयात पहिल्या स्थानावर आहे.

9. नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बेंगळुरूने सलग पाचव्या वर्षी कायद्यातील पहिले स्थान कायम राखले आहे.

10. पहिल्या 10 महाविद्यालयांपैकी पाच महाविद्यालये दिल्लीमधील असलेल्याने महाविद्यालयांच्या क्रमवारीत दिल्लीतील महाविद्यालयांचे वर्चस्व आहे.

11. द सवीथा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेसने मणिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेसला मागे सारत प्रथमच दंत चिकित्सा विषयात अव्वल स्थान पटकावले आहे.

इंडिया रँकिंग 2022 पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा:    https://www.nirfindia.org/2022/Ranking.html

 

 

 

 

R.Aghor/Sonal C/Shraddha/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1841936) Visitor Counter : 733


Read this release in: Odia , English , Urdu , Hindi , Tamil