वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातल्या वस्त्रोद्योगाचे नाव जगभरात अधिक उंचावण्याकरिता फॅशन उद्योगासाठी ‘पाच एफ’मंत्र : पीयूष गोयल

प्रविष्टि तिथि: 12 JUL 2022 8:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जुलै 2022

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग मंत्री  पीयूष गोयल आणि हरियाणाचे मुख्यमंत्री  मनोहर लाल खट्टर यांनी आज पंचकुला येथील  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या नवीन संकुलाचे  उद्‌घाटन केले.

उद्‌घाटनानंतर आपल्या भाषणात  पियुष गोयल यांनी या संकुलाचे   नियोजन आणि बांधकाम करणारे  विविध चमू , स्थापत्य  विभाग, एनआयएफटी  हरियाणा तंत्रशिक्षण आणि इतर विभागांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. ज्यांच्यामुळे या संकुलाची स्थापना शक्य झाली ते हरियाणाचे मुख्यमंत्री  मनोहर लाल खट्टर यांच्या प्रयत्नांचे गोयल यांनी विशेष कौतुक केले.  भारताच्या वस्त्रोद्योगाचे जगभरात नाव अधिक उंचावण्याकरिता  गोयल यांनी फॅशन उद्योगासाठी 5 एफ या  मंत्रात  फार्म्स टू फायबर टू फॅब्रिक टू फॅशन टू फॅशन टू फॉरेन एक्सपोर्ट  अशी सुधारणा केली.

एनआयएफटी ही  फॅशन संबंधी शिक्षण देणारी  देशातील अग्रणी संस्था असून  कापड  आणि तयार कपडे  उद्योगाला व्यावसायिक  मनुष्यबळ पुरवण्यात  आघाडीवर आहे.

 

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1841024) आगंतुक पटल : 213
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Punjabi , English , Urdu , हिन्दी