भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

निवडणूक प्रक्रियेचे काटेकोर पालन हे भारतीय निवडणूक आयोगाचे गुणवैशिष्ट्य : मुख्य निवडणूक आयुक्त

Posted On: 12 JUL 2022 4:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जुलै 2022

 

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने निरीक्षक म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने 18 जुलै 2022 रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतपेट्या, मतपत्रिका, विशेष पेन आणि अन्य सीलबंद निवडणूक साहित्य दिल्लीचे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र  आणि पुदुचेरीच्या केंद्रशासित प्रदेशांसह राज्य विधानसभा सचिवालयांना वितरित करण्यास आणि पाठवण्यास आज सुरुवात केली. नवी दिल्लीतील निर्वाचन सदन येथे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्या देखरेखीखाली  दोन दिवस राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना कालबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने निवडणूक साहित्य पाठवण्यात येत आहे.

निवडणूक प्रक्रियेचे काटेकोर पालन करून कुठल्याही त्रुटीशिवाय निवडणुका पार पाडणे हा भारतीय निवडणूक आयोगाचा गुणविशेष आहे असे मुख्य निवडणूक आयुक्त  राजीव कुमार यांनी राज्यांमधील सहाय्यक निर्वाचन अधिकाऱ्यांशी बोलताना अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले की निवडणूक आयोजित करण्यासाठी निवडणुकीची प्रत्येक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उत्तमरीत्या परिभाषित सूचना आणि प्रमाणित कार्यपद्धतींचे पालन होणे आवश्यक आहे. त्यांनी अधिकार्‍यांना सतर्क राहण्यास सांगितले आणि मतपेट्या आणि मतपत्रिकांसह निवडणूक साहित्याची वाहतूक आणि त्या ताब्यात असताना प्रोटोकॉल आणि मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन होईल याकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.

निवडणुकीदरम्यान मतदान आणि मतमोजणीच्या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी आयोगाने 37 निरीक्षकांची नियुक्ती देखील केली आहे आणि 11 जुलै 2022 रोजी या निरीक्षकांची एक विशेष  बैठक देखील आयोजित करण्यात आली होती.

 

 

 

 

 

 

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1840937) Visitor Counter : 733