भारतीय स्पर्धा आयोग
azadi ka amrit mahotsav

शेल ओवरसीज इन्वेस्टमेंट बी.व्ही द्वारे ॲक्टीस सोलेनर्जी लिमिटेडकडून (Actis Solenergi Limited)सोलेनर्जी पॉवर प्रायव्हेट लिमिटेडच्या संपादनाला भारतीय स्पर्धा आयोगाची मंजूरी

Posted On: 12 JUL 2022 4:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जुलै 2022

 

शेल ओवरसीज इन्वेस्टमेंट बी.व्ही (अधिग्रहण कर्ता) द्वारे क्टीस सोलेनर्जी लिमिटेडकडून (Actis Solenergi Limited) सोलेनर्जी पॉवर प्रायव्हेट लिमिटेडच्या (लक्ष्य) संपादनाला भारतीय स्पर्धा आयोगाने काल मंजूरी दिली. स्पर्धा कायदा, 2002 च्या कलम 31 (1) अंतर्गत ही मान्यता दिली आहे.

प्रस्तावित संयोजन 100% समभाग संपादनाशी संबंधित आहे आणि अधिग्रहणकर्त्याद्वारे लक्ष्याचे संपूर्ण नियंत्रण यात आहे.

अधिग्रहण कर्ता, ही नेदरलँड्समधली कंपनी आहे आणि ती शेल समूहाचा एक भाग आहे. ही एक होल्डिंग कंपनी आहे. शेल पीएलसी ही अंतिम होल्डिंग कंपनी आहे आणि विविध कंपन्यांमध्ये (शेल ग्रुप) प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे तिची गुंतवणुक मालकी आहे.

शेल पीएलसीचे समभाग लंडन स्टॉक एक्सचेंज, युरोनेक्स्ट मस्टरडॅम आणि न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहेत. शेल ग्रुप हा 70 पेक्षा जास्त देशांमध्ये 83,000 कर्मचारी असलेला ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांचा जागतिक समूह आहे.

लक्ष्यित कंपनी ही मॉरिशसमधे नोंदणी असलेली एक गुंतवणूक कंपनी आहे, ती क्टीस समूहाशी संबंधित आहे.  त्याची सध्या भारतातील अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक आहे.

भारतीय स्पर्धा आयोगाचा तपशीलवार आदेश लवकरच येईल.

 

 

 

 

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1840933) Visitor Counter : 60


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil