उपराष्ट्रपती कार्यालय
ईद-उल-जु़हा'च्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी दिल्या देशाला शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
09 JUL 2022 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जुलै 2022
उद्याच्या 'ईद-उल-जु़हा' च्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी देशबांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा संपूर्ण संदेश खालीलप्रमाणे---
"'ईद-उल-जु़हा' च्या पवित्र प्रसंगी मी देशातल्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो.
पारंपरिक श्रद्धा आणि उत्साहाने साजरा केला जाणारा 'ईद-उल-जु़हा'चा सण बलिदानाचे आणि ईश्वराच्या बाबतीत असलेल्या भक्तीचे प्रतीक आहे.
एकमेकांप्रतीच्या स्नेहाची देवाणघेवाण आणि एकमेकांची काळजी घेण्याचा, तसेच गरजू आणि गरिबांप्रती करुणा व्यक्त करण्याचा हा सण आहे.
या सणामुळे समाजात एकता आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ होईल, आणि लोक एकमेकांच्या जवळ येतील, अशी मला आशा आहे.
'ईद-उल-जु़हा' सणाशी जोडले गेलेले उत्कृष्ट आदर्श, आपल्या आयुष्यात शांतता आणि सद्भावनेला अधिक बळकट करतील आणि आपल्या देशात समृद्धी येईल, अशी कामना करतो.
उपराष्ट्रपतींचा संदेश हिंदी आणि इंग्रजीत पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1840438)
आगंतुक पटल : 177